गर्दीतील बाबा बोकडे संतप्त झाला आणि… नागपुरात काय घडलं; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Dec 07, 2024 | 11:00 AM

नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने पीएसआयंना धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाबा बोकडे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेपूर्वी, एका दुचाकी अपघातात अश्विन गेडाम यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मोठी गर्दी झाली होती आणि याच गर्दीत बाबा बोकडे यांनी पोलिसांशी वाद घालून त्यांना मारहाण केली. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गर्दीतील बाबा बोकडे संतप्त झाला आणि... नागपुरात काय घडलं; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
गर्दीतील बाबा बोकडे संतप्त झाला आणि..
Follow us on

कुणाला कशाचा राग येईल ते सांगता येत नाही. क्षुल्लक कारणावरूनही लोक हल्ली भांडू लागतात. डोक्यात राग इतका असतो की प्रकरण हमरीतुमरीवर जातं. राज्यात कुठे ना कुठे असे प्रकार घडत असतात. त्याच्या बातम्याही होतात. आता नागपुरातीलच पाहा ना. एका व्यक्तीची एवढी हिंमत झाली की त्याने थेट नागपूरच्या एका पीएसआयलाच धक्काबुक्की झाली. थेट पोलीस अधिकाऱ्याशीच असं वागल्यावर मग जे व्हायचं ते झालं. पठ्ठ्याला थेट आत जावं लागलं. असं काय केलं या माणसाने? का होतोय या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल?

नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या पीएसआयला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बाबा बोकडे असं या व्यक्तीचं नाव आहे. तो 40 वर्षाचा आहे.

एकाचा मृत्यू

अश्विन गेडाम हे गुरुवारी रात्री त्यांच्या मामाच्या घरून येत असताना दुचाकी घसरली असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात पडले. या विचित्र आणि दुर्देवी अपघातात अश्विन गेडाम यांचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे हे आपल्या ताफ्यासह शुक्रवारी सकाळीच घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. गर्दी इतकी होती की पोलिसांना पंचनामा करताना अडचणी येत होत्या. याच गर्दीत बाबा बोकडे नावाचा इसम होता. त्यालाही पोलिसांनी दूर जायला सांगितलं. पण तो ऐकेच ना. त्याची पोलिसांसोबत हुज्जत झाली.

अखेर अटक

गर्दीत असलेला बाबा बोकडे अत्यंत संतापला होता. त्याने थेट पीएसआय साळुंखे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने कृष्णा साळुंखे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्याची इतकी मजल गेल्याने पोलीसही संतापले. अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखवत बाबा बोकडेला अटक केली. बाबाविरोधात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि सरकारी कामात अडथळे आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.