Mumbai Crime : प्रेमासाठी वाट्टेल ते..! विवाहीत प्रेयसीला मिळवण्यासाठी प्रियकराने रचला भयानक कट, थेट लहानग्या लेकीला वेठीस धरलं …

| Updated on: Sep 08, 2023 | 12:34 PM

प्रेमात लोकं वाट्टेल ते करू शकतात. कुठलीही हद्द पार करतात. पण काही वेळा हेच प्रेम अतिशय धोकादायक ठरू शकते. अशीच एक घटना समोर आली असून तेथे एका प्रियकराने त्याच्या विवाहीत प्रेयसीला मिळवण्यासाठी थेट तिच्या लहानग्या लेकीलाच वेठीस धरलं.

Mumbai Crime : प्रेमासाठी वाट्टेल ते..! विवाहीत प्रेयसीला मिळवण्यासाठी  प्रियकराने रचला भयानक कट, थेट लहानग्या लेकीला वेठीस धरलं ...
Follow us on

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : प्रेमासाठी लोकं काहीही करू शकता. प्रसंगी ते कुठलीही हद्द पार करू शकतात. वेळ आलीच तर जीव देण्याचीही प्रेमवीरांची तयारी असते. पण काहीवळा प्रेमात आंधळं होऊन असं पाऊल उचललं जातं, ज्यामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे, जिथे एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला मिळवण्यासाठी तिच्या लेकीलाच वेठीस (crime news)  धरलं. नवऱ्याला सोडून विवाहीत प्रेयसीने आपल्याकडे यावं यासाठी प्रियकराने तिच्या लहान मुलीचंच अपहरण केल्याची धक्कादायक घटना नागपाडा येथे घडली. पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेतला असतो, तो जिथे सापडला ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. आरोपी, त्या लहान मुलीसह चक्क एक्स्प्रेसच्या वॉशरूममध्ये (railway washroom) लपला होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि लहानग्या मुलीला आईकडे सोपवण्यात आले.

नक्की काय झालं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोतिन घोष आरोपीचे नाव असून तो नागपाडा येथील कामाठीपुरातील रहिवासी आहे. नागापाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांच्याकडे एक २८ वर्षीय महिला तक्रार दाखल करण्यास आली होती. तीही कामाठीपुरा येथील रहिवासी आहे. रोतिन घोष या तिच्या प्रियकराने तिच्या पाच वर्षांच्या लहानग्या लेकीचं अपहरण केल्याचं तिने नमूद केल. घोष हा महिलेच्या घरी आला होता आणि ती महिला झोपलेली असतानाच तो तिच्या मुलीला घेऊन पसार झाला. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी घोषचा शोध घेतला. रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव स्थानकात शालिमार एक्स्प्रेसच्या टॉयलेटमधून अटक करण्यात आले. त्याच्यासोबत महिलेची लहानगी लेकही होती. त्या दोघांनाही शहरात परत आणण्यात आले असून आरोपी घोष याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

तक्रारदार महिलेला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन जुळी मुलं असून ते दोघेही पहिल्या इयत्तेत शिकतात.तर तिचा पती हा कार्पेंटर म्हणून काम करतो. आरोपी घोष हा मुलीला घेऊन पसार झाल्याचे समजताच तिने पोलिसांकडे धाव घेतली. ती नवऱ्याला सोडून आपल्याकडे आली तर मुलगी परत देऊ, अशी अट आरोपीने तिला घातली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. त्यांनी सीसीटीव्ही फूटेज चेक करून आणि तांत्रिक तपासानंतर आरोपी हा इगतपुरी स्टेशनात असल्याचे पोलिसांना समजले, मात्र हाडा एक्प्रेस, अमृतसर एक्प्रेसमध्ये शोधूनही पोलिसांना तो कुठेच सापडला नाही.

त्यानंतर पोलिसांनी जीआरपीला कळवले आणि त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव स्थानकावर शालीमार एक्स्प्रेस तपासण्यास सांगितले. मात्र, तेथेही संपूर्ण एक्स्प्रेस पिंजून काढल्यानंतरही त्यांना आरोपी सापडलाच नाही. तेव्हा पोलिसांनी त्यांना पुन्हा एकदा शोध घेण्याची विनंती केली, रेल्वेतील टॉयलेट्सही शोधण्यास सांगितली. अखेर आरोपी घोष हा लहानग्या मुलीसह एका वॉशरूममध्ये लपून बसल्याचे पोलिसांना आढळले व त्यांनी त्याला ताब्यात घेतले.