Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या वेदनादायक रेल्वे दुर्घटनेचे (odisha railway accident) दुःख अद्याप कमी झालेले नाही. या अपघाताने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. अनेक मुले अनाथ झाली. अनेकांचं आयुष्य बदलून गेलं. ज्यांनी हा अपघात आणि तेथील दृष्यं पाहिलंते मुळापासून हाजरले. या अत्यंत भीषण आणि वेदनादायक अपघातात 270 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. ती घटना आठवून लोक अजूनही घाबरतात. या घटनेत पीडित कुटुंबांचे अश्रू पुसण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
मात्र याचा अनेक जण गैरफायदाही घेत असल्याचे समोर आले आहे. याबाबत फसवणूकीचे अनेक प्रकारही समोर आले आहेत. सरकारी नोकरीच्या लालसेपोटी बिहारमधील एका तरुणाने आपल्या मृत आईला पुन्हा मारले. ओडिशा रेल्वे अपघातात रेल्वे अपघातात आईचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्याने सरकारी नोकरीची मागणी केली. त्यासाठी तो भामटा चक्क रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या घरापर्यंत पोहोचला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कुमार असे आरोपीचे नाव असून तो पाटणा येथील रहिवासी आहे. मृत्यूचा खोटा दावा करून तो रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचला. रेल्वेमंत्र्यांच्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना रेल्वे भवनात जाण्याचे आदेश दिले. यानंतर तो मंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला. बालासोर रेल्वे अपघातात आईचाही मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, चौकशीदरम्यान तो सतत आपले म्हणणे बदलत होता, त्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या व्यक्तीकडे त्याच्या आईच्या रेल्वे प्रवासाचा कोणताही पुरावा नव्हता. आणि अशा प्रकारे त्याचा बनाव उघडकीस आला.