सातारा : लग्न होत नसल्याच्या नैराश्येतून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे (Man Commit Suicide). सातारा येथील नागठाणे गावात ही घटना घडली आहे. बोरगाव पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे (Man Commit Suicide).
सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. योगेश सूर्याजी मगर (वय 44) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. योगेश मगर हा त्याच्या आईसोबत नागठाणे येथे राहत होता. त्याने गावातच मेन रोडवर असलेले एक दुकान भाड्याने घेऊन टेलरिंग व्यवसाय सुरु केला होता. झोपण्यासाठी तो नेहमी रात्री दुकानातच जात होता.
गेल्या अनेक वर्षांपासून तो लग्नासाठी प्रयत्न करत होता. वय वाढत होतं पण, लग्न होत नव्हतं. त्यामुळे गेल्या अनेक काळापासून तो नैराश्यात होता.
शनिवारी दिवसभर योगेश घरी न आल्याने त्याची आई रात्री उशिरा दुकानात गेली. त्यांनी दुकानाचे शटर उघडून बघितले असता योगेशने त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
योगेशने नैराश्येतून आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अहमदनगरच्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा, महिलेचे शीर उडवून बालकाला संपवणारा सापडला https://t.co/HULMrEPN6G #Ahmednagar | #DoubleMurder | #Shevgaon
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 2, 2021
Man Commit Suicide
संबंधित बातम्या :