विवाहानिमित्त नाचगाणे सुरु होते मंडपात, अचानक जे झाले त्यानंतर एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं

| Updated on: Nov 12, 2022 | 6:32 PM

पाली जिल्ह्यातील रानवस येथे कुटुंबीयांच्या घरी लग्नाचा सोहळा सुरू होता. यानिमित्त शुक्रवारी संगीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभात सलीम भाई हे ही सहभागी झाले होते.

विवाहानिमित्त नाचगाणे सुरु होते मंडपात, अचानक जे झाले त्यानंतर एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं
राजस्थानमधील पाली जिल्ह्यात नाचताना व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू
Image Credit source: social
Follow us on

पाली : लग्न समारंभानिमित्त आयोजित संगीत कार्यक्रमात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनंतर काही वेळापूर्वी उत्साह आणि आनंद असलेल्या लग्न घरावर शोककळा पसरली. संगीत कार्यक्रमात नाचत असताना अचनाक हृदयविकाराचा झटका आल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील पाली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सलीम भाई राणावास असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

सलीमच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एकच खळबळ माजली. काही वेळापूर्वी आपल्यासोबत नाचणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याचे पाहून समारंभात उपस्थित लोकांनाही धक्का बसला.

लग्नानिमित्त संगीताचा कार्यक्रम सुरु होता

पाली जिल्ह्यातील रानवस येथे कुटुंबीयांच्या घरी लग्नाचा सोहळा सुरू होता. यानिमित्त शुक्रवारी संगीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभात सलीम भाई हे ही सहभागी झाले होते.

हे सुद्धा वाचा

सलीम भाई नातेवाईकांसोबत डान्स करत होते

संगीत समारंभासाठी स्टेज सजवण्यात आला होता. डान्स सुरु होता. सलीम भाई हे ही इतर नातेवाईकांसोबत स्टेजवर डान्स करत होते. सलीम भाई हे मूळचे गुडा रामसिंह येथील रहिवासी असून पेशाने शिक्षक आहेत.

स्टेजवर अन्य तीन लोकांसोबत सलीम भाई डान्स करत होते. थोडा वेळ नाचल्यानंतर सर्व जण थांबतात आणि स्टेजवरुन जात असतात. यावेळी अचानक सलीम भाई स्टेजवर खाली कोसळतात.

बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेले मात्र…

तेथे उपस्थित मंडळी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात, मात्र सलीम भाई बेशुद्ध होतात. सर्व जण त्यांना तात्काळ रुग्णालयात घेऊन जातात. रुग्णालयात डॉक्टरांनी सलीम भाईला तपासून मृत घोषित केले. सलीमच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.