भोपाळ : मध्य प्रदेशमधील (MP) भिंड येथे 1 मे रोजी शहरातील तलावात कार पडून अपघात झाला होता. कारमधील मित्रांनी पोलिसांना सांगितले की, राहुल डोहरे हा त्याच्या मैत्रिणीशी व्हिडिओ कॉलवर (video call) बोलत होता. मैत्रिणीने भेटण्यास नकार दिल्याने राहुल डोहरे याने मी कायमचा निघून जात असल्याचे सांगून फोन कट केला. यानंतर तो काही वेळ शांत राहिला आणि त्यानंतर त्याने भरधाव वेगाने कार घेऊन तलावात उडी मारली. या अपघातात राहुलचा मृत्यू झाला तर कारमधील इतर दोन तरूण सुरक्षुत आहेत. पोलिसांनी दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत.
आधी गाडीत दारू प्यायला, मग गर्लफ्रेंडला बोलावलं
१ मे च्या रात्री, राहुल आणि नीतू आणखी एका मित्रासह डबल ओम्नी कारमध्ये होते. राहुल आणि नीतू यांनी कारमध्येच दारू प्यायली. नशा चढताच राहुलला त्याच्या गर्लफ्रेंडची आठवण झाली. यानंतर रात्री 11.15 वाजता राहुलने प्रेयसीला फोन केला. दोघांमध्ये बोलणं झालं. त्याने तिला व्हिडिओ कॉलही केला. त्याने तिला भेटायला बोलावले. मात्र तिने नकार दिला. तू आली नाहीस तर मी तलावात उडी मारून जीव देईन, असे राहूलने त्याच्या गर्लफ्रेंडला या घटनेनंतर तुमची बदनामी होईल. मात्र त्याच्या गर्लफ्रेंडला ते मान्य नव्हते, तिने येण्यास नकार दिला.
त्यानंतर राहूलने तलावाच्या दिशेने गाडी वळवली व तो त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलत राहिला. त्यांचा वाद झाला, त्यामुळे चिडलेल्या राहूलने गाडी भरधाव वेगाने तलावाच्या दिशेने नेली. त्याच्या एका मित्राने प्रसंगावधान राखून गाडीतून उडी मारली. मात्र राहूल व दुसरा मित्र तलावातच पडले. यात राहूलचा बुडून मृत्यू झाला, दुसरा मित्र सुदैवाने वाचला.
पोलिस करत आहेत तपास
या घटनेबद्दल कळल्यानंतर राहुलचा भाऊ, त्याची आई आणि इतर नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून माहिती गोळा केली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, कुटुंबीय पोलिसांसमोर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.