एकाच कुटुंबातील 5 लोकांच्या हत्येने पहाटेच गाव हादरलं. तेथे एका इसमाने त्याच्याच कुटुंबातील पाच जणांची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून त्याने त्याचं आयुष्यही संपवलं. पोटच्या लेकांसह त्याने पत्नीला आणि जन्मदात्या आईचीही हत्या केली. उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे हा दुर्दैवी प्रसंग घडल्याचे समोर आले आहे. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाबद्दल समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रामपूर-मथुरा पोलिस स्टेशन हद्दीतील पल्हापूर गावात ही घटना घडली. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
सीतापूरच्या एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग सिंह असे आरोपीचे नाव असून तो 45 वर्षांचा होता. तो मानसिकदृष्ट्या कमकुवत होता आणि त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्याने त्याच्याच कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. आरोपी अनुरागने आधी त्याची आई, पत्नी आणि मुलांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली. मृतांमध्ये स्वत: अनुराग, त्याची 65 वर्षीय आई सावित्री, त्याची 40 वर्षीय पत्नी आणि तीन मुलांचा (वय 12, 9 आणि 6 वर्षे) समावेश आहे. पहाटेच्या सुमारास हे हत्याकांड घडलं. घरातून आरडा-ओरड्यायाचा आवाज ऐकून शेजारी तेथे पोहोचले. समोरचं दृश्य पाहून ते हादरलेच. कोणीतरी तातडीने या हत्याकांडाची माहिती पोलिसांना दिली.
व्यसनी होता आरोपी
शेजारच्या लोकांनी पोलिसांना या कुटुंबाबद्दल आणि आरोपीबद्दल माहिती दिली. त्यांच्या सांगण्यानुसार, आरोपी अनुराग हा व्यसनी होता . त्याला नशामुक्ती केंद्रात घेऊन जायचा कुटुंबियांचा प्रयत्न होता, त्यावरूघरात न रात्री वाद झाला. त्यानंतर पहाटे पाच वाजता अनुरागने सर्वांची हत्या केली. घटनास्थळीअधिका-यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात व्यस्त आहे. मात्र या हत्याकांडानंतर र संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे. घटनास्थळाबाहेर लोकांची गर्दी झाली आहे. पोलीस कोणालाही घराजवळ येऊ देत नाहीत.
छत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
एक दिवसापूर्वी छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली होती. कोरबा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील उर्गा पोलिस स्टेशन हद्दीतील कुकरीचोली गावात जयराम रजक (28), त्यांची पत्नी सुजाता रजक (25) आणि मुलगी जयसिका (दोन वर्षे) यांची काल रात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांनी रजक कुटुंबीयांच्या हत्येची माहिती पोलिसांना दिली, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह घरातून बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले. सध्या या प्रकरणाचाही तपास सुरू आहे.