Navi mumbai Crime : आता सोन्याची चेन खेचण्याची अनोखी पद्धत, तुम्ही विचारच करु शकत नाही, तो असा सोन्यावर हात मारेल

| Updated on: Sep 14, 2023 | 10:43 AM

नवी मुंबई शहरात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरी करण्यासाठी चोरटे नवनव्या क्लृप्त्या लढवत असून त्याचाच फटका खारघरमधील एका व्यक्तीला बसला आहे.

Navi mumbai Crime : आता सोन्याची चेन खेचण्याची अनोखी पद्धत, तुम्ही विचारच करु शकत नाही, तो असा सोन्यावर हात मारेल
Follow us on

नवी मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : नवी मुंबईतील गुन्हेगारीचं (crime in navi mumbai) प्रमाण वाढू लागलं आहे. शहरातील वेगेवगळ्या भागात रोज नवनवे गुन्हे घडत आहे. काही ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच एक धक्कदायाक घटना खारघर येथे घडली आहे. तेथे एका भामट्याने नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चेन (stole gold chain) लंपास करत पोबारा केला आहे. विशेष म्हणजे त्याने गुप्तदान करण्यासाठी आल्याचे सांगत फसवणूक केली. याप्रकरणी खारघर पोलिस अधिक तपास करत असल्याचे समजते.

नक्की काय घडलं ?

खारघरच्या सेक्टर 12 येथे ही चोरीची ही घटना घडली. सेक्टर 12 येथे अंजली पाटील यांनी गणपती मूर्ती विक्रीचा स्टॉल लावला आहे. तेथे त्या गणपतींच्या मुर्तींचे डेकोरेशन करत होत्या. मात्र तेवढ्यात तेथे एक अनोळखी इसम आला. त्याने हेल्मेट घातल्याने चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. सुमारे 35 ते 40 वर्षांचा असलेला इसम पाटील यांच्या स्टॉलसमोर आला. त्यावेळी त्याने पाटील यांच्याशी संवाद साधत मी गुप्तदान करण्यास आल्याचे सांगितले. त्या भामट्याने पाटील यांना बोलण्यात गुंतवत 22 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केली आणि तो तेथून फरार झाला. याप्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहे.