सोशल मीडियाचं वेड भोवलं, सात जन्मांचं वचन मोडलं, ‘ती’ सवय आवडत नव्हती, म्हणून त्याने सरळ पत्नीचा गळाच…

| Updated on: Aug 14, 2023 | 11:56 AM

या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी त्या महिलेचा पती आणि तिचे वडील या दोघांनाही अटक केली आहे.

सोशल मीडियाचं वेड भोवलं, सात जन्मांचं वचन मोडलं,  ती सवय आवडत नव्हती, म्हणून त्याने सरळ पत्नीचा गळाच...
crime
Follow us on

बंगळुरू | 14 ऑगस्ट 2023 : आजकाल बहुतांश लोकं मोबाईल, सोशल मीडियावर (social media) गुंतलेले असतात. त्यावर स्क्रोलिंग करत तासनतास घालवतात. सोशल मीडियाचं हे व्यसन अनेकांना वेड लावतंय. पण एका महिलेचा (crime news) याच व्यसनाने घात केला.

कर्नाटकच्या कोप्पलु गावात राहणाऱ्या महिलेला सोशल मीडियाचं प्रचंड वेड होत, पण तिच्या पतीला ते आवडत नव्हतं. या कारणावरून झालेल्या भांडणानंतर पती एवढा संतापला की त्याने आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन दिलेल्या पत्नीचंच आयुष्य संपवलं. एवढंच नव्हे तर त्यानंतर त्याने त्याच्या सासऱ्यांच्या मदतीने तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. अखेर पतीने पोलिसांमध्ये आत्मसमर्पण करत गुन्हा कबूल केला.

रील आणि शॉर्ट व्हिडीओ बनवण्याच्या सवयीवरून व्हायचे वाद

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनाथ व त्याची पत्नी यांचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्यांना एक मुलगीदेखील आहे. त्याच्या बायकोला मोबाईलवर रील आणि शॉर्ट व्हिडीओ बनवण्याची आवड होती, मात्र याच मुद्यावरून दोघांमध्ये तणाव निर्माण व्हायचा आणि वाद वाढायचे.

तीन दिवसांपासून सुरू होता वाद, अखेर ओढणीने गळाच…

श्रीनाथ असे आरोपीचे नाव असून फोन वापरण्याच्या मुद्यावरून त्याचे पत्नीशी नेहमी भांडण होत असे. हत्याकांडाच्या तीन दिवसांपूर्वीही दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. दिवसेंदिवस वाद वाढत गेला आणि अखेर संतापलेल्या श्रीनानने ओढणीने गळा आवळून पत्नीला संपवले. त्यानंतर त्याने त्याचे सासर, अर्थात पत्नीचे वडील शेखर यांच्यासमोर आपला गुन्हा कबूल केला. पोटच्या मुलीचा जीव गेला तरी त्यांनी जावयाला मदत करायचे ठरवले.

दगड बांधून मृतदेह नदीत..

तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्या दोघांनी मोटारसायकलचा वापर केला. नंतर त्यांनी तिच्आ मृतदेहाला एक मोठा दगड बांधला आणि अखेर तो नदीत फेकून दिला. हत्येनंतरत काही दिवसांनी श्रीनाथ हा निमिशाम्बा मंदिरात गेला होता.
मात्र परत आल्यावर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत हत्येची कबुली दिली. एवढेच नव्हे तर सासऱ्यांनीही मदत केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.