जेवणानंतर शतपावली करायला गेले ते परत आलेच नाहीत, अल्पवयीन नातवाने आजोबांचा का काढला काटा ?

| Updated on: Dec 09, 2024 | 11:34 AM

संपत्तीच्या वादातून एक भयानक गुन्हा नंदुरबारजवळ घडली आहे. त्यामुळे अख्खं शहर हादरलं आहे. संपत्तीच्या वादातून एक अल्पवयीन मुलगा त्याच्या आजोबांच्याच जीवावरच उठल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला

जेवणानंतर शतपावली करायला गेले ते परत आलेच नाहीत, अल्पवयीन नातवाने आजोबांचा का काढला काटा ?
क्राईम न्यूज
Follow us on

पैशाचा मोह प्रचंड वाईट असतो, त्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. प्रसंगी एखाद्याच्या जीवावरही उठू शकतो, मग तो माणूस आपला आहे की बाहेरचा याचाही कोणी विचार बघत नाही. अशाच संपत्तीच्या वादातून एक भयानक गुन्हा नंदुरबारजवळ घडली आहे. त्यामुळे अख्खं शहर हादरलं आहे. संपत्तीच्या वादातून एक अल्पवयीन मुलगा त्याच्या आजोबांच्याच जीवावरच उठल्याचा भयानक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी शहाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

शतपावली करायला गेले पण परतलेच नाहीत घरी

मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबारजवळच्या शहादा शहरात हा दुर्दैवी प्रकार घडला. शहादा शहरातील शिरूड रस्त्यावर असलेल्या तापी रेसीडन्सीजवळ कौटुंबिक वादातून एका 60 वर्षांच्या इसमाचा खून करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगाच गुन्हेगार असून त्यानेच त्याच्या आजोबांचा जीव घेतल्याचे उघड झाले आहे.

दशरथ राजे ( वय 60) असे मृत इसमाचे नाव असून रविवारी रात्री 9 च्या सुमारास ते जेवणानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते. मात्र त्याचवेळी त्यांच्या अल्पवयीन नातवाने संधी सांधली. अल्पवयीन नातू आणि त्याचा एक साथीदार हे बाईकवरून त्यांच्याजवळ आले आणि त्या नातवाने संधी राजे यांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. हल्ल्यानंतर तो अल्पवयीन मुलगा आणि त्याचा साथीदार दोघेही तेथून लागलीच फरार झाले.

राजे यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच त्यांच्या मुलाने व परिसरातील इतर नागरिकांनी तेथे तातडीने धाव घेतली आणि गंभीर जखमी झालेल्या राजे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी खाजगी वाहनातून नेलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणाची माहिती मिळताच शहादा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी राजे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.  प्रभारी पोलीस निरीक्षक हे पुढील तपास करत आहेत.