Mangaon : थेट 70 फूट खोल कोसळून बस उलटली! 2 जण जागीच तर दोघे उपचारादरम्यान ठार, खासगी बसचा भीषण अपघात

| Updated on: May 08, 2022 | 1:51 PM

पावसाळ्यात अनेकदा घाटात अपघात होत असतात. परंतु आज बस उलटली आणि लोकांची भंबेरी उडाली. बस पलटी झाल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ मदतीला सुरूवात केली.

Mangaon : थेट 70 फूट खोल कोसळून बस उलटली! 2 जण जागीच तर दोघे उपचारादरम्यान ठार, खासगी बसचा भीषण अपघात
घोणसे घाटात खासगी बस उलटली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

माणगाव : माणगाव म्हसळा (Mhasala) दरम्यान घोणसे घाटात (Ghonase Ghat) खासगी प्रवासी बसला भीषण अपघात झाला आहे. एका वळणाला अचानक बस (Bus) उलटल्याने दोन प्रवाशांचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर दोन प्रवाशांचा उपचार सुरू असताना काहीवेळाने मृत्यू झाला आहे. किती प्रवासी होते, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर पंचवीस जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. सर्व प्रवाशी हे ठाण्यातील रहिवासी होते. अपघातामध्ये जखमी झालेल्या सगळ्या प्रवाशांना म्हसळा ग्रामीण रुग्णालय आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. अपघात कशामुळे झाला यांचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तपास करीत आहेत.

बस 60 फूट खोल दरीत कोसळली.

प्रवासी बस दरीत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जखमी झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन अशा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. ही बस 60 फूट खोल दरीत कोसळली. जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव येथील रुग्णालयात नेण्यात आलं आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी प्रशासनाने तातडीने धाव घेतली आहे. सर्व यंत्रणा तात्काळ मदतकार्यास लागल्या आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली आहे.

जखमींवरती रूग्णालयात उपचार सुरू

पावसाळ्यात अनेकदा घाटात अपघात होत असतात. परंतु आज बस उलटली आणि लोकांची भंबेरी उडाली. बस पलटी झाल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ मदतीला सुरूवात केली. तसेच अॅब्युलन्स आणि पोलिसांनी जखमी रूग्णांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे. अपघात इतका भीषण होता, की चार जणांचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर पंचवीस जण जखमी झाले आहेत. जखमींवरती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

सगळे प्रवासी ठाण्यातील आहेत

सगळे प्रवासी ठाण्यातील आहेत. कोणत्या कारणासाठी तिकडे निघाले होते. याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलिस क्रेनच्या साहाय्याने बस सरळ करीत आहेत. त्याचबरोबर घटनास्थळी लोकांची गर्दी सुध्दा आहे. बस अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.