अहमदाबाद : अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एका महिलेच्या आत्महत्येची अशी घटना समोर (Married Woman Ayesha Last Viral Video) आली आहे, ज्याबाबत संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. येथे एका विवाहित महिलेने पहिले व्हिडीओ बनवला आणि मग तिने साबरमती नदीत उडी घेत आत्महत्या केली (Married Woman Ayesha Last Viral Video).
वैवाहिक जीवनात पतीमुळे होणाऱ्या मानसिक तणावाला कंटाळून या महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी महिलेकडून बनवण्यात आलेल्या शेवटचा व्हिडीओ आणि महिलेचं तिच्या वडिलांशी झालेलं संभाषणाचा ऑडिओ जप्त केला आहे. तसेच, महिलेच्या पतीविरोधात चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
अहमदाबादच्या वटवा परिसरात राहणाऱ्या आयशा आरीफ खान 25 फेब्रुवारीला रिवरफ्रंट साबरमती नदीत उडी घेतली. आत्महत्या करण्यापूर्वी पहिले तिने एक अखेरचा व्हिडीओ तयार केला. ज्यामध्ये ती म्हणाली, तिच्या पतीला स्वतंत्र करत, असं म्हणत तिने हसत हसत व्हिडीओ तयार केला आणि मृत्यूला कवटाळले.
आयशाच्या आत्महत्येची बातमी ऐकून संपूर्ण देश हळहळला आहे. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी आयशा आपल्या आई-वडिलांसोबतही बोलली. तिने तिच्या आई-वडिलांना मृत्यूची परवानगी मागितली. आयशा मकरानीच्या आत्महत्येच्या प्रकरणात वडील लियाकत अली (Liyakat Ali) यांनी रिवरफ्रंट पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मुलगी आयशा उर्फ सोनूचं लग्न 2018 मध्ये राजस्थानचे राहणारे आरिफ खानसोबत झालं होतं.
She Took Her Life While Smiling!#Ayesha (23) was deserted & harassed by Aarif Khan(husband) & his family who is from Jalore, #Rajasthan. She committed suicide by jumping into the river Sabarmati #Ahmedabad. Now the question is, will she get Justice?
May Her Soul Rest In Peace? pic.twitter.com/97YKG7HZsm— Youth Against Rape ® (@yaifoundations) February 28, 2021
लग्नानंतर आयशाचे सासरचे आणि तिचा पती तिला हुंड्यासाठी त्रास द्यायचे. वर्ष 2018 च्या डिसेंबरमध्ये तिच्या पतीने हुंड्यासाठी तिच्याशी भांडण केलं आणि आयशाला तिच्या माहेरी सोडून आला. नंतर समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन या समस्येचं समाधान काढलं आणि आयशा पुन्हा सासरी गेली. पण, 2019 मध्ये आयशाला तिच्या सासरचे माहेरी सोडून गेले (Married Woman Ayesha Last Viral Video).
त्यानंतर आयशाचा पती तिच्या घरी आला आणि हुंड्याचे दीड लाख रुपये घऊन गेला. आरिफ पुन्हा एकदा आयशासा घेऊन गेला आणि काहीच दिवसांत तिला पुन्हा माहेरी सोडून गेला. त्यानंतर आयशाने आपल्या सासरच्यांविरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणी तक्रार दाखल केली. आयशाच्या आत्महत्येच्या दिवशी आरिफने आयशा फोन करुन जीव दे आणि त्याचा व्हिडीओ बनवण्यासाठी सांगितलं होतं. त्यामुळे आता तिच्या कुटुंबाने पतीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आयशाचे वडील लियाकत अली यांच्यानुसार, पैसे दिल्यानंतरही आरिफच्या कुटुंबाचा लोभ वाढत गेला. काही महिन्यांपूर्वी आरिफ पुन्हा आयशाला अहमदाबादला सोडून गेला. आरिफ आयशासोबत फोनवरही बोलत नव्हता. काही दिवसांपूर्वी आयशाने रागाच्या भरात आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. यावर आरिफने उत्तर दिलं की, जीव द्यायचा असेल तर दे. हे ऐकून आयशाला धक्का बसला आणि अखेर तिने आपली जीवन यात्रा संपवली.
आयशा आत्महत्या प्रकरणात रिवरफ्रंट वेस्ट पोलिसांनी तपास केला तेव्हा माहिती मिळाली की आयशाद्वार आत्महत्या करण्यापूर्वी बनवण्यात आलेला व्हिडीओ पतीला पाठवला होता. पती आणि सासरच्यांद्वारे आयशाचा जाच करुन तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पतीच्या अटकेसाठी पोलिसांची एक टीम राजस्थानला पाठवण्यात आली आहे.
Married Woman Ayesha Last Viral Video
संबंधित बातम्या :
रेशनिंग दुकानदाराच्या पत्नीची दुकानातच हत्या, डोंबिवलीत खळबळ
घरातील कटकटींचा वैताग, आधी लोखंडी रॉडने पत्नीचा खून; नंतर मुलीचाही गळा दाबला