सातारा : विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यातील कोपर्डे सासर असणाऱ्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. मयुरी चंद्रशेखर शिंदे असं विवाहितेचं नाव आहे. पोलिसांनी विवाहितेच्या सासरकडील 7 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मयुरी चंद्रशेखर शिंदे असे त्या विवाहितेचे नाव असून चार वर्षा पूर्वी मयुरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा असून कोपर्डे येथील हे दाम्पत्य आपल्या मुलासमवेत गुजरातच्या नवसारी येथे नोकरी निमित्ताने राहत होते. पण गुजरात आणि कोपर्डे येथे वारंवार होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन गुजरात येथे आत्महत्या केली.
यानंतर आत्महत्या केलेल्या विवाहितेचा अंत्यविधी माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारातच केल्याने तणाव निर्माण झाला. लोणंद पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मध्यस्थी करत प्रकरण हाताळल्याने तणावावर नियंत्रण मिळवता आले. याप्रकरणी सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरे उत्तमराव शिंदे सासु बेबी शिंदे , नवरा चंद्रशेखर शिंदे , दिर प्रशांत शिंदे, नणंदा संगीता भोसले,स्वाती काकडे, मंगल कदम या लोकांचे विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इकडे पुण्यात कामावरून काढून टाकल्याच्या रागातून चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवली. ही घटना भोसरीलगतच्या इंद्रायणीनगर येथे घडली. सोमवारी पहाटे चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवून दिली.
-चालकाला कामावरून काढल्याच्या रागातून चालकाने आपल्या भावाला सोबत घेऊन मालकिनीची कार जाळून टाकली. याबाबत कारच्या मालकीनीने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विनोद किसनराव भस्के आणि अंकित किसनराव भस्के अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे नाव आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.
आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी महिलेकडे कारवर चालक म्हणून कामाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याला फिर्यादी महिलेनं कामावरून काढून टाकले होते. या कारणामुळे संतापलेल्या आरोपी विनोद याने आपल्या भावासोबत इंद्रायणीनगर, भोसरी येथील तिलक रेसिडन्सी येथे येऊन कारवर स्फोटक द्रव्य टाकून 22 लाख रुपयांची कार जाळून टाकली.
(Married woman commits suicide due to father in laws harassment in satara khandala)
हे ही वाचा :
आई शेतात गेली, नराधमांकडून गतिमंद तरुणीवर घरात घुसून बलात्कार, महाराष्ट्रातील अत्याचार थांबेनात!
देश हादरवण्याचा कट, सातवी कारवाई, जोगेश्वरीतून आणखी एकाला उचलला, ATS-CBI अॅक्शन मोडमध्ये!
पुण्यात तहसीलदाराला ‘गुगल पे’वरुन जबरदस्तीने 50 हजाराची लाच देणाऱ्या दोघांना अटक