अहमदाबाद : लग्न झाल्यानंतर (after marriage) पती-पत्नी एकमेकांच्या समीप येतात. गप्पा गोष्टी करतात. उद्याच्या भविष्याची स्वप्न पाहतात. एकमेकांना आपली सुखदु:खं शेअर करतात. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या शपथा घेतात. त्यातून दोघे एकमेकांच्या अधिक जवळ येतात. एकमेकांना समजून घेतलं जातं. नातं अधिक घट्ट होतं. पण जुनागढमध्ये मात्र एक धक्कादायकच प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतरही पती जवळ आला नाही. शारीरिक संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे हताश झालेल्या विवाहितेने थेट पोलीस ठाण्यात धाव (married woman went to police) घेतली. लग्न तर केलं पण शारीरिक संबंध ठेवण्यात पतीलाही जराही इंट्रेस्ट नसल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. पोालिसांनी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.
ही महिला 23 वर्षाची आहे. फेब्रुवारी 2022मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. पोरबंदरमध्ये अत्यंत थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नानंतरच्या दुसऱ्या आठवड्यातच तिला पतीला शारीरिक संबंध ठेवण्यात कोणताही रस नसल्याचं लक्षात आलं. जेव्हा जेव्हा पती सोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा पती दूर पळाला. त्यामुळे संबंध ठेवताच आले नाही. पतीकडून कोणताही रिस्पॉन्स मिळत नव्हता. त्याने लग्न केलं. पण पत्नी होण्याचा अधिकार दिला नाही, असं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
जीवे मारण्याची धमकी
एका महिलेने आपल्या तक्रारीत आणखी एक धक्कादायक गोष्ट नमूद केली आहे. पतीच्या या वागण्याबाबत सासरच्या लोकांना माहिती दिली. तेव्हा नवऱ्याला समजावण्या ऐवजी सासरकडच्यांनी मलाच झापले. या विषयावर चर्चा करू नको म्हणून बजावलं. घरच्यांना मी ही गोष्ट सांगितल्याचं नवऱ्याला जेव्हा कळलं तेव्हा त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोपही या महिलेने तक्रारीत केला आहे.
चोरीचा आरोप
या महिलेने आपल्या तक्रारीत सासूवरही आरोप केला आहे. सासूने आपल्याकडे वारंवार हुंडा मागितला. तो न दिल्याने सासूकडून वारंवार टोमणे मारले जात असल्याचं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. तसेच सासूने माझ्यावर 200 रुपये चोरल्याचा आरोपही केल्याचं तिने म्हटलं आहे. आपण चोरी केली नाही, असं सांगितल्यावर पतीकडून बेदम मारहाण झाल्याचंही तिने म्हटलं आहे. सासू आणि नवऱ्याकडून छळ होत असल्यानेच आईवडिलांकडे जुनागढला राहत असल्याचं तिने म्हटलं आहे.