मुंबई : एक मटका किंग, (Matka King) ज्याची हत्या झाली. एक बायको जिनं नवऱ्याला संपवलं. एक भाऊ ज्यानं भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वहिनीच्याच हत्येची सुपारी दिली, अगदी चित्रपटाला शोभावी अशी ही कहाणी…ज्यात ड्रामा, थ्रील, अॅक्शन आहे. पण ही कहाणी खरीय, ही कहाणी आहे मटका किंग सुरेश भगत, त्याची बायको जया भगत, त्याचा भाऊ विनोद भगत यांच्यातल्या मटका वॉरची…(Matka King’s Brother Held For Rs 60 Lakh Supari To Kill Matka Queen Jaya Bhagat )
1950 च्या दशकात गुजरातहून कल्याणजी भगत (Kalyanji Bhagat) हा मुंबईत आला…आणि नवा सट्टा सुरु केला, त्याला नाव पडलं मटका. कल्याणजीच्या मृत्यूनंतर मटक्याचं साम्राज्य आलं, ते त्याला मुलगा सुरेश भगतकडे (Matka King Suresh Bhagat)…सुरेश भगतचं मुंबईत मटक्याच्या व्यवसायावर राज्य होतं. त्यातूनच त्यानं अनेक शत्रू तयार केले. पण त्याच्या जिवावर उठलेले खरे शत्रू त्याच्या घरातच असतील, याचा अंदाज त्याला सुरुवातीला आला नाही. जिच्यावर जिवापाड प्रेम केलं ती बायको, आणि मुलगाच त्याला संपवण्याचा कट करतील हा विचारही त्याला आला नाही. मात्र काही काळातच त्याला ही जाणीव होई लागली.
मटका किंग सुरेश भगतची बायको जया भगत… (Matka Queen Jaya Bhagat) अरुण गवळी (Arun Gawali) गँगशी संपर्क आल्यानंतर तिची मैत्री याच गँगच्या सुहास रोगेसोबत (Suhas Roge) झाली. सुहास आणि जयाला मटक्याच्या साम्राज्यावर राज्य करायचं होतं. मटका क्वीन होण्याची स्वप्न तिला पडू लागली. आणि याच मैत्रीतून एक कट शिजला. 2008 साली अलिबागजवळ एका ट्रकवाल्यानं सुरेश भगतच्या गाडीला चिरडलं. अपघात दाखवून हत्याकांड पचवण्याचा प्रयत्न सुहास आणि जयानं केला. पण काहीच काळात हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
हत्याकांड पचलं असं समजून जया आणि सुहास निर्धास्त झाले. पण, हत्या झालेल्या सुरेश भगतमुळेच जयाचं पितळं उघडं पडलं. सुरेश भगतला आधीच आपल्या हत्येचा कट शिजत असल्याचा वास लागला होता. जिवंत असतानाच त्यानं मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला (Mumbai police Crime Branch) त्याची बायकोच हत्येचं कारण ठरु शकते असं सांगितलं होतं. शिवाय, मुंबई उच्च न्यायालयाला (Mumbai High Court) पत्र लिहून त्यानं जिवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. आणि त्याच आधारावर चौकशी सुरु झाली. त्यात ट्रकचालकासह सुरेश भगतची पत्नी जया भगत, मुलगा हितेश भगत, आणि सुहास रोगेसह 8 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
सुरेश भगतच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भावाची एन्ट्री
हे सगळं इथेच संपत नाही, या सगळ्यानंतर कहाणीत एन्ट्री होते, मृत सुरेश भगतचा भाऊ विनोद भगतची…काही दिवसांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या जया भगतला जामीन मिळाला आणि ती बाहेर आली. बाहेर आल्यानंतर ती घाटकोपरला आपल्या बहिणीच्या घरी पोहचली. आणि याच दोघी विनोद भगतच्या निशाण्यावर आल्या.
दोन हत्या, प्रत्येक हत्येची किंमत 30 लाख (30 lack), विनोदनं बदला घेण्यासाठी तब्बल 60 लाखांची (60 lack) सुपारी दिली. सगळी तयारी झाली होती. मात्र, ज्याला सुपारी दिली, तोच पोलिसांच्या तावडीत सापडला. 18 डिसेंबरला यूपीच्या बिजनौरमध्ये राहणारा अन्वर दर्जीला गजाआड केलं गेलं. दर्जीजवळ जया आणि तिच्या बहिणीचे फोटो सापडले. या फोटोची ज्यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली, तेव्हा सुपारीचा कट समोर आला.
पोलिसांना गुंगारा देण्यासाठी जया आणि तिच्या बहिणीच्या हत्येची थेट सुपारी देण्यात आली नाही. तर यामध्ये सुपारीची साखळी पाहायला मिळते. अन्वर दर्जीला ही सुपारी जावेद अन्सारीनं दिली होती. जावेदला ही सुपारी रामवीर शर्मा उर्फे पंडितनं दिली होती. पंडितला ही सुपारी बशीर बेगानी उर्फ मामूनं दिली होती, जो इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये राहतो. मामू, पंडित आणि विनोद भगत आधीपासून एकमेकांना ओळखत होते. याच आधारावर पोलिस विनोद भगतपर्यंत पोहचले.
मटका, हत्याकांड आणि सुपारी सगळा खेळ केल्या 2 दशकांपासून मुंबईत सुरु आहे. अंडरवर्ल्डनंतर मटक्याच्या साम्राज्यावर राज्य करण्यासाठी आता एकाच कुटुंबातील एकमेकांच्या जिवाचे वैरी झाले आहेत. त्यावरुन हे साम्राज्य किती परसलं आहे, याचा अंदाज येतो.
संबंधित बातम्या :
(Matka King’s Brother Held For Rs 60 Lakh Supari To Kill Matka Queen Jaya Bhagat )