Meerut murder : 800 रुपयात मटण कापण्याचे दोन चाकू, 300 रुपयात वस्तरा… डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची भानगड काय?

| Updated on: Mar 21, 2025 | 7:25 PM

मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडात नवीन खुलासे झाले आहेत. सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांनी नियोजनबद्धपणे ही हत्या केली. मुस्कानने डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्यांची रेसिपी मिळवली आणि ऑनलाइन औषधे खरेदी केली. तिने गूगलवरून झोपेच्या आणि नशेच्या गोळ्यांची माहिती शोधली आणि सौरभच्या खाद्यपदार्थात मिसळली.

Meerut murder : 800 रुपयात मटण कापण्याचे दोन चाकू, 300 रुपयात वस्तरा... डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची भानगड काय?
Saurabh Case
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us on

मेरठमध्ये सौरभ राजपूत हत्याकांडाच्या चौकशीत रोज नवीन खळबळजनक माहिती समोर येत आहे. पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहे. सौरभची बायको मुस्कानने ही हत्या घडवून आणली. सौरभची हत्या घडवून आणण्यासाठी मुस्कानने डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन आणि ऑनलाईन सर्चिंगचा सहारा घेतला होता. झोपेच्या गोळ्यांपासून मादक पदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्ट तिने प्लानिंगने केली होती. त्यात तिला तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मदत केली होती.

मुस्कानने 22 फेब्रुवारी 2025 रोजी शारदा रोड येथील एका डॉक्टरकडे जाऊन स्वत:ला डिप्रेशन असल्याचं सांगितलं होतं. तिने डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या देण्याची मागणी केली. कारण प्रिस्क्रिप्शन शिवाय झोपेच्या गोळ्या कोणत्याही मेडिकलमध्ये मिळत नाही हे तिला माहीत होतं. त्यामुळे तिने डॉक्टरकडून झोपेच्या गोळ्या घेतल्या. डॉक्टरनेही तिला या गोळ्या दिल्या. पण मुस्कानचं अजून काम संपलं नव्हतं. तिने गूगलवर जाऊन झोपेची गोळी आणि मादक पदार्थांच्या गोळ्यांचं खास साल्ट (रासायनिक नाव) शोधलं. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये त्याचाही समावेश केला. त्यानंतर ती प्रियकरासोबत खैरनगर गेली. तिथून तिने झोपेच्या गोळ्या आणि मादक पदार्थाच्या गोळ्याही घेतल्या. प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं साल्टमध्ये डायजेपाम वा अल्प्राजोलम सारखी औषधं असू शकतात. या औषधांमळे प्रचंड झोप येते आणि त्यामुळे माणूस बेशुद्ध होतो, असा पोलिसांना संशय आहे.

वाचा: फक्त तिचा हात हातात घेण्यासाठी पैसे मोजावे लागायचे, तरुणांच्या रांगा लागायच्या; सत्य उलगडताच पोलीसही चक्रावले

ऑनलाईन काय काय मागवलं?

मुस्कानचं षडयंत्र केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन पुरतं मर्यादित राहिलं नाही. तर तिने ऑनलाइन सर्च करून हत्या करण्यासाठीचं महत्त्वाचं सामानही खरेदी केलं. तिने गूगलवरून झोपेच्या आणि नशेच्या गोळ्या मागवल्याचं चौकशीत निष्पन्न झालं. त्यातील साल्टच्या उपलब्धतेचाही तिने शोध घेतला. त्याशिवाय तिने ऑनलाइनवर तिने काही खास औषधांचीही माहिती मिळवली. त्याशिवाय शारदा रोडवर जाऊन तिने 800 रुपयाचे मटन कापण्याचे दोन चाकू घेतले. 300 रुपयाचा वस्तरा घेतला. पॉली बॅगही खरेदी केली. स्थानिक दुकानातूनच तिने हे सामान खरेदी केल्याचं सांगितलं जातं. पण ऑनलाइन सर्च करून या वस्तूंची किंमत पडताळली जाणार आहे.

हत्येसाठी वापर

झोपेच्या आणि नशेच्या गोळ्यांचा वापर करून मुस्कानने सौरभला बेशुद्ध केलं. 3 मार्च रोजी सौरभने त्याची आई रेणूच्या घरून दूधी कोफ्त्याची भाजी आणली होती. दूधी कोफ्त्यात मुस्कानने झोपेच्या गोळ्या आणि नशेच्या गोळ्या टाकल्या. त्या आधी तिने सौरभच्या दारूतही तिने झोपेच्या गोळ्या टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण सौरभने दारू घेतली नाही. कोफ्त्यात औषध मिसळलेलं होतं. कोफ्ता खाल्ल्यावर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर मुस्कान आणि साहिलने त्याची मान वस्तऱ्याने कापली आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले.

पोलिसांचा कसून तपास

एसपी (शहर) आयुष विक्रम सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. मुस्कान आणि साहिलने नोव्हेंबर 2024पासूनच सौरभच्या हत्येचा प्लान सुरू केला होता. डॉक्टरचं प्रस्क्रिप्शन आणि ऑनलाइन सर्चिंग हे या षडयंत्राचा एक महत्त्वाचा भाग होता. या औषधांशिवाय तिने अजून काय काय ऑनलाइन मागवलं होतं, याचा आम्ही तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीम औषधांच्या सँपलचा तपास करत आहे. त्यामुळे लवकरच रिपोर्ट येईल असं आयुष विक्रम सिंह यांनी सांगितलं.