महिला, मुलींविरोधातील अत्याचाराच्या घटनांनी राज्य अगदी ञवळून निघालं असून रोजच्या रोज या घटना कुठेना कुठे घडल्याचे उघडकीस येतच आहे. कधी ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलींवर तर कधी शेजारी खेळायला गेलेल्या मुलीला घरात कोंडून तिच्यावर अत्याचार, तर कधी पोटच्या पित्यानेच मुलीचं शोषण केल्याच्या घटना रोज कानावर पडत असतात. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनामुळे नागरिकांमध्ये संतप्त वातावरण असलं तरी नराधम गुन्हेगारांना कायद्याचा काही धाकच उरलेला नाही असं चित्र दिसतंय.
त्यातच आता मुंबईतील चारोकप भागातून भयानक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, मात्र तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्यावर अत्याचार करून तिचे अश्लील छायाचित्र आपल्या मित्राला देखील पाठवल्याचं उघड झालं. याप्रकरणी 16 वर्षीय मुलाविरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अश्लील फोटो ज्या 21 वर्षांच्या तरूणाला पाठवण्यात आला त्याच्याविरोधातही चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर 16 वर्षांच्या आरोपीची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी 17 वर्षांची असून 16 वर्षीय आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिचा अश्लील फोटो 21 वर्षांच्या मित्राला पाठवला. या घटनेनंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. ते ऐकून आई हादरली पण गुन्ह्याला वाचा फोडण्यासाठी तिने चारकोप पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी भादंवि कलम 380 व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम 4,8, 12 व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम 67 अंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
4 वर्षाच्या चिमुकल्या मुलावर 24 वर्षीय नराधमाचे अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचार
पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकल्यावर एका 24 वर्षीय नराधमाने अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने शहर हादरले. राजगुरुनगर येथे वास्तव्यास असणारा चिमुकला घराजवळ खेळत असताना नराधम आरोपीने त्याला खाऊचं आमिष दाखवलं तो त्याला घरात घेऊन गेला. तेथे त्याने त्या चिमुकल्यावर अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचार केले. याप्रकरणी राजगुरुनगर पोलीसांत नराधम विजय ताठोड याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र या अमानुष अत्याचाराच्या घटनेने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.