उपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Aug 01, 2021 | 11:04 PM

राज्याची उपराजधानी नागपुरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली असल्याचं समोरं आलं आहे . नागापूर पोलिसांनी यातील चार संशयित आरोपीना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे.

उपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

नागपूर: राज्याची उपराजधानी नागपुरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली असल्याचं समोरं आलं आहे. नागापूर पोलिसांनी याप्रकरणी चार संशयित आरोपीना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे. पीडित मुलगी गतिमंद असल्याचं कळतंय.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना

महाराष्ट्राच्या उपराजधानीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. काही नराधमांनी रात्रीचा अंधाराचा फायदा घेत आणि मुलगी गतिमंद असल्याचं हेरत तिला मोमीनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत नेलं. त्या ठिकाणी चार जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार करुन त्या नंतर तिला ऑटोने मेयो रुग्णालय परिसरातील मेट्रो ब्रिज जवळ सोडलं. आरोपी त्यानंतर पळून गेले.त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या इतर दोन संशयितांनी तिच्यावर ऑटो रिक्षामध्ये अत्याचार केला आणि ते पण पळून गेले.

पीडित मुलगी त्याच ठिकाणी पडून असल्याचं बघून जवळच असलेल्या रेल्वे पोलिसांना याची माहिती काही नागरिकांनी दिली. रेल्वे पोलिसांनी तिला विचारपूस करत चाइल्डला दिली त्यांनी मुलीला आपल्या सोबत घेऊन गेले आणि विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने माहिती दिली. चाइल्ड लाईनने रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यांनी चार आरोपींचा शोध घेत ताब्यात घेतलं.

प्रकरण सीताबर्डी पोलीस हद्दीतील असल्याने ताब्यात घेतलेले आरोपी आणि मुलीला सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आता सीताबर्डी पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. चार आरोपींना ताब्यात घेतलं असून आणखी कोणी यात सहभागी आहे का याचाही शोध घेण्यात येत आहे.

इतर बातम्या:

पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची मनाई असताना धरणात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू

मुलीचं वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी लग्न, गर्भधारणा झाल्यानंतर अखेर डॉक्टरांना समजलं, अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार

 

minor divyang girl assaulted in nagpur railway police taken remand of four accused sitabardi police started investigation