Mira Road Murder : मृत्यूनंतर तिच्यासोबत ‘तो’ फोटो काढला, मनोज सानेच्या कबुलीने पायाखालची वाळूच सरकली

| Updated on: Jun 16, 2023 | 11:38 AM

Mumbai Murder : मीरा रोड हत्याकांडात रोज नवनवे खुलासे होत असून मारकेरी मनोज सानेने दिलेल्या माहितीमुळे पोलिसही चक्रावले आहेत. त्याने अत्यंत थंड डोक्याने हा खून केल्याचे समजते.

Mira Road Murder : मृत्यूनंतर तिच्यासोबत तो फोटो काढला, मनोज सानेच्या कबुलीने पायाखालची वाळूच सरकली
Follow us on

मुंबई : मीरा रोड (Mira Road Murder) येथील इमारतीत राहणाऱ्या सरस्वती वैद्य हिच्या निर्घृण हत्येमुळे सर्वच हादरले. या हत्याकांडात रोज नवनवे खुलासे होत असून मारकेरी मनोज सानेने दिलेल्या माहितीमुळे पोलिसही चक्रावले आहेत. मनोजन केवळ तिची हत्याच केली नाही तर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते करून कुत्र्यांनाही खाऊ घातले. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी यासाठी त्याने वेबसीरिज पाहिल्या, गुगलवरही सर्च केल्याचे समोर आले आहे.

अत्यंत थंड डोक्याने हत्या करणारा मनोज हा रोज नवनवे खुलासे करत असून त्याने दिलेल्या माहितीमुळे सर्वच हैराण झाले आहेत. नुकतीच तपासात एक नवी माहिती समोर आली आहे. सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोजने तिचा न्यूड फोटो काढल्याचे कबूल केले. पोलिसांच्या चौकशीत ‘मी मनोविकृत आहे, सनकी आहे ‘ अशी कबुलीही त्याने दिली. सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे का केले, असे पोलिसांनी विचारले असता मनोज साने याने हे उत्तर दिले. कोणताही आढेवेढे न घेता साने यांनी शांत चित्ताने उत्तर दिले, असं समजा की ‘मी मानसिकदृष्ट्या विकृत आहे.’

पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस घेणार इतर राज्यातील तांत्रिक तज्ज्ञांची मदत

मनोज सानेने संपूर्ण नियोजन करून सरस्वतीची हत्या केली. सरस्वतीच्या मृतदेहाचे ३५ अवयव सापडले आहेत, मात्र अनेक भागांचा शोध सुरू आहे. सरस्वतीची हत्या मनोज सानेनेच केली होती हे सिद्ध करणे, हे पोलिसांसमोरचे आव्हान आहे. मी हा खून केला नाही, असे मनोजने पूर्वीच पोलिसांना सांगितले होते. तिने आत्महत्या केली आणि आपल्यावर त्याचा आळ येईल, या भीतीने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, असे मनोजने सांगितले होते.

कोर्टात पलटू शकतो मनोज

मनोज साने न्यायालयातही हेच सांगू शकतोत. पकडले गेलो, तर काय उत्तर देणार याची तयारी त्याने आधीच केल्याचे मनोजच्या जबाबावरून कळते. अशा स्थितीत मनोज साने याने खून कसा केला हे सिद्ध करण्यासाठी स्थानिक पोलिसांनी अन्य राज्यातील तांत्रिक तज्ज्ञांचे मत घेण्याचे ठरवले आहे.

पोलीस करत आहेत कसून चौकशी

पोलिस मनोज साने याची कसून चौकशी करत आहेत. सरस्वती ही त्याची पहिलीच बळी आहे का, यापूर्वीही त्याने असे गुन्हे केले आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. काही दिवसांपूर्वी पालघरच्या गोठ्यात असाच खून झाला होता. त्या हत्येतील मारेकरी शोधू शकले नाहीत., त्यामुळे पोलीस त्याची सविस्तर चौकशी करत आहे. पालघर येथील हत्येनंतर एका महिलेचा मृतदेह तुकड्यांमध्ये पोलिसांना सापडला. या हत्येशी मनोज सानेचा काही संबंध आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत.