नाशिक : गेल्या काही वर्षांपासून नाशिककर नाशिकच्या इंदिरानगर ( Nashik Track ) जॉगिंग ट्रॅक वर सकाळी व्यायामाला येत असतात. कुणी ट्रॅकवर वॉकिंग करतात तर कुणी ग्रीन जीमवर व्यायाम करतात. मात्र, याच काळात जर थकवा आला तर त्यासाठी पालिकेच्या माध्यमातून काही लाकडी बाकडे टाकण्यात आली होती. लाखों रुपये यासाठी खर्च करण्यात ( Nashik News ) आले होते. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर असलेली बाकांचा मोठा आधार बसण्या करिता होता. विशेषतः वृद्ध नागरिकांना याचा मोठा दिलासा होता. मात्र ह्याच लाकडी बाकांची चोरी होऊ लागली आहे.
इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक वरील लाकडी बाकांच्या चोरी प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहे. लाकडी बाके चोरी करणारे कोण आहे ? याची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे.
इंदिरानगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. ट्रॅक वर व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी ही बाब मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर टाकली होती.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ही बाब पोलिसांना कळविली असून पोलिसांनी घटनास्थळी पाहिणी केली असून तपास सुरू केला आहे. विशेष बाब म्हणजे या चोरीच्या प्रकरणात नागरिक व्यायाम करत असतांना त्यांच्या डोळ्यासमोरून बाके उचलून नेल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे ही बाके संपूर्ण चोरून नेली जात नाही, लाकडी फळ्या तिथेच टाकून देत फक्त लोखंडी सांगाडा घेऊन जाण्याचा हा प्रकार आहे. यामध्ये नियमितपणे व्यायामाला जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली आहे.
त्यामुळे गुन्हेगारी वाढत चालली असून पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा सवाल करत असतांना गुन्ह्याचा छडा न लावल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अचानक ही चोरीची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.