नाशिक : राज्यात सगळीकडे बारावीची परीक्षा (12th exam) सुरु आहे. विद्यार्थ्यांचे (student tention) काही पेपर सुध्दा झाले आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला गेल्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. ही घटना नाशिक (nashik) जिल्ह्यात घडली आहे. मोबाईल चोरीला गेल्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे प्रकरण विद्यार्थ्यांनी सुरुवातीला शाळा प्रशासनाच्या कानावर घातलं, त्यानंतर काहीचं उत्तर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे प्रकरण पोलिसांच्या कानावर घातलं आहे. सध्या विद्यार्थ्यांचे मोबाईल शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
राज्यात सर्वत्र बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे. मात्र नाशिकमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान काहीसा मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना घडली. नाशिकच्या नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूल तसेच बिटको हायस्कूल मधील बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असताना अज्ञात व्यक्तीने 11 विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरल्याची घटना घडली. चोरीला गेलेले मोबाईल दोन हजार ते दहा हजार रुपये किमतीच्या दरम्यानचे आहेत. त्या मोबाईल चोरीमुळे आता शाळा प्रशासन आणि पोलीस यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
नाशिकमध्ये दोन परीक्षा केंद्रावरुन विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला गेल्यामुळे पालकांनी सुध्दा नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे चोरीचं प्रकरण घडल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करीत असताना काहीवेळेला माहितीसाठी मोबाईलचा उपयोग होत होता. परंतु मोबाईल चोरीला गेल्यामुळे मोठा खोळंबा झाला आहे.
पोलिस परिसरातील सीसीटीव्ही आणि शाळेच्या आवारातील सीसीटिव्हीची चौकशी करीत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.