मुंबई | 27 जुलै 2023 : तुम्ही घराबाहेर असताना जर तुमचा मोबाईल सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगला लावत असाल तर सावधान, कारण तुमच्या मोबाईलच्या सॉफ्टवेअरमध्ये शिरकाव मिळवित तुमचे बॅंक खाते रिकामे होऊ शकते असा इशारा खुद्द रिझर्व बॅंकेने दिला आहे. अलिकडे काही घोटाळेबाज स्कॅमर्स ज्यूस जॅकींग स्कॅमद्वारे लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत.
अनेकवेळा मोबाईल चार्जिंग नसल्याने अनेक सार्वजनिक ठिकाणी एखाद्या दुकानात, रेल्वे किंवा बस स्थानकांत मोबाईल चार्जिंग स्टॅंडवर मोबाईल चार्जिंग बिनधास्तपणे करीत असतात. परंतू अशा प्रकारे मोबाईल चार्जिंग करण्यात आर्थिक फसवणूक होऊ शकते असे आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडीयाने एक परिपत्रक काढले आहे. फायनान्स संबंधी जोडलेल्या फ्रॉडवर आरबीआयच्या एका नोटबुकनूसार ज्यूस जॅकींगचा वापर करुन लोकांना लुबाडले जात आहे. हा एक असा घोटाळा आहे ज्यात सायबर क्रिमिनल्स मोबाईलमधील महत्वाचा डाटा चोरी करीत आहेत. ज्यामुळे लोकांना आर्थिक फटका बसू शकतो.
ज्यूस जॅकींक स्कॅममध्ये सायबर क्रिमिनल्स मोबाईल आणि लॅपटॉप सारख्या डीव्हाईसमधील महत्वाचा डाटा चोरी करण्याचा प्रकार बेमालूमपणे करीत असतात. हा घोटाळा करण्यासाठी सायबर आरोपी सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर युएसबी पोर्टद्वारे किंवा चार्जिंग कियोस्क द्वारे लोकांना आपल्या जाळ्यात अडवकतात. म्हणून अशा ठिकाणी मोबाईल चार्जिंग करताना काळजी घ्यायला हवी आहे. सायबर धोकेबाज सार्वजनिक चार्जिंग पोर्टचा वापर करीत फोनमध्ये मालवेअर ट्रान्सफर करण्यासाठी करतात. हे सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलवर नियंत्रण मिळत गळली माहीती चोरते. अशा व्यक्तीचे इमेल, एसएमएस आणि पासवर्डची माहीतीवर नियंत्रण मिळवित डाटा चोरीद्वारे पैसे चोरले जातात अशी माहीती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे.
स्कॅमर्स आधी पब्लिक चार्जिंग स्टेशनवर मालवेअर सॉफ्टवेअर या हार्डवेअर सेट करतात. सर्वसाधारण एअरपोर्ट, रेल्वेस्थानक सारख्या गर्दीच्या ठिकाणी करतात. त्यानंतर स्कॅमर्स चार्जिंग स्टेशनला मोफत सुविधा दिल्याने अनेक जण त्याचा लाभ घेतात. त्यानंतर घोटाळेबाज आपला डाव साधतात. जसे युएसबी केबल चार्जिंगसाठी मोबाईल जोडली जाते तसे इंस्टॉल केलेले मालवेअर युजरचा डाटा चोरी करतात. स्कॅमर कनेक्टेड डीव्हाईसने प्रायव्हेट डाटा उदा. पासवर्ड, फोटो आणि बॅंकेची माहीती चोरी केली जाते.
सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग टाळले पाहीजे. घरातून निघतानाच मोबाईल संपूर्ण चार्ज करुन निघाले पाहीजे. किंवा मोबाईल चार्जर सोबत ठेवायला हवा. एवढेच नाही तर सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरले पाहीजे. मोबाईल नेहमी सॉफ्टवेअर अपडेट करायला हवा.मालवेअर डीटेक्ट करणारे सॉफ्टवेअर इंस्टॉल करायला हवे.