नाशिक : व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी महिला सावकाराने दंबगगिरी करत महिला आणि एका पुरुषाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीये. जिल्ह्यातील नांदगावच्या पिंप्राळे येथे ही घटना घडलीये. पैशांसाठी महिला सावकाराने दुसऱ्या महिलेला विवस्त्र करण्याचासुद्धा प्रयत्न केलाय. या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हयरल होत आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. (moneylender women beaten man and tried to undress women for 15 thousand video goes viral)
मिळेलेल्या माहितीनुसार नांदगावमधील प्रिंप्राळे येथे एका गरीब दाम्पत्याने संगीता वाघ या महिला सावकाराकडून 15 हजार रुपये व्याजाने घेतले होते. यातील बरीच रक्कम पीडित कुटुंबाने परत केली होती. मात्र, परत केलेली रक्कम हे फक्त व्याज असून मूळ किंमत अजून शिल्लक असल्याचा दावा संगीता वाघ या महिलेने केला. त्यानंतर या महिला सावकाराने कर्ज घेतलेली महिला आणि एका पुरुषाला अमानुषपणे मारहाण केली.
पैशांसाठी एवढी अमानुषता…!
अशा प्रकारांची तत्काळ दखल घेणं गरजेचं आहे.
#stopviolence |#ViolenceAgainstWomen pic.twitter.com/HV9AUSZ2Fx— prajwal dhage (@prajwaldhage100) March 22, 2021
दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यामुळे या प्रकाराची माहिती नंतर पोलिसांना समजली. हा प्रकार समजताच नांदगाव पोलिसांनी महिला सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल असून या प्रकराचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, पैशांसाठी अमानुष मारहाण केल्यामुळे सर्व स्तरातून रोष व्यक्त होतोय.
इतर बातम्या :
विरारमध्ये चेन स्नॅचिंग करणारे सराईत आरोपी अटकेत, 5 लाख 74 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त
खंडणीप्रकरणी देशमुखांची चौकशी करून गुन्हा दाखल करा; भातखळकरांची पोलीस ठाण्यात तक्रार
‘माय लॉर्ड! मी एक नाही 16 खून केलेत’, कबुली जबाब ऐकून न्यायाधीशही अवाक, वाचा काय आहे प्रकरण?
(moneylender women beaten man and tried to undress women for 15 thousand video goes viral)