मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोन (Khargone News) जिल्ह्यात शनिवारी रात्री एक लग्न झालं. तिथं करण्यात आलेल्या जेवणातून अनेकांना विषबाधा झाल्याचं उघकीस आलं आहे. विशेष म्हणजे लग्नात आलेल्या ४० पेक्षा अधिक लोकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. रात्री उशिरा उल्टी आणि पोटात दुखू लागल्यामुळे जिल्हा रुग्णालयात (hopital) लोकांना दाखल करण्यात आलं आहे. त्यामध्ये महिला, पुरुष आणि मुलं सुध्दा आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार खरगोनच्या न्यू हाउसिंग बोर्ड कॉलनी येथील आहे. शनिवारी रात्री लग्नात अनेक लोकं सामील झाले होते. रात्री जेवण झाल्यानंतर अनेक पैपाहुण्यांना त्रास सुरु झाला. एका पाठोपाठ एकाला त्रास सुरु झाला. नंतर डॉक्टरांकडे दाखल झाल्यानंतर जेवणातून विषबाधा झाल्याचं उघडकीस आलं आहे.
सगळ्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती
सगळ्यांनी एक शंका उपस्थित केली आहे, जेवणात दुधाचा एक पदार्थ ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना त्रास झाला आहे. रात्री उशिरा सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. सध्या रुग्णालयात दाखल केलेल्या सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे.
दोन ते तीन गावातील लोकांना हा त्रास झाला आहे. सगळ्यांना त्रास व्हायला सुरुवात झाल्याने लोकांची मोठी पळापळ सुरु झाली होती. लग्नात आलेले सगळे पैपाहुणे त्यामुळे अधिक घाबरले. ज्या तरुणांचा त्रास कमी झाला आहे. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. काही रुग्णांच्यावरती अजून उपचार सुरु आहेत. लोकांना नेमकी कशामुळं विषबाधा झाली आहे. याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोषी व्यक्तीवर कारवाई कऱण्यात येणार आहे.