Crime News : आईच आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम असतं (mother loves kids) असं म्हणतात. पण नोएडा येथे एका आईने या प्रेमळ नात्यालाच काळिमा फासला. तिने मुलाच्या प्रेमापुढे वासनेला जास्त महत्व दिलं आणि त्या वासनेच्या आगीत निष्पाप मुलाचाही बळी दिला. हे वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल ना पण ग्रेटर नोएडामध्ये आईनेच पोटच्या गोळ्याला (mother killed son) संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामागचं कारण तर आणखीनच धक्कादायक आहे.
बादलपूर येथे राहणारा अंकित हा आठ वर्षांचा छोटा मुलगा दोन जुलैपासून संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाला होता. मात्र 7 जुलै रोजी त्याचा मृतदेह संभळ येथे आढळून आला. याप्रकरणाचा तपास करताना जे सत्य समोर आलं ते ऐकून पोलिसही हादरले. अंकितची आई भुरी हिचे शेजारी राहणाऱ्या ओमपाल या इसमाशी अनैतिक संबंध होते. अंकितने त्या दोघांना एकदा नको त्या अवस्थेत पाहिले होते. अंकितने त्याचं तोंड उघडलं तर त्यामुळे आपली बदनामी होईल अशी भीती भूरी हिला वाटली.
त्यामुळे ओमपालच्या सांगण्यावरून तिने स्वत:च्या मुलाची हत्या केली. त्यानंतर भूरीचे जिजाजी व आणखी एका नातेवाईकाने अंकितचा मृतदेह १५० किमी लांब नेऊन फेकण्यास भूरीची मदतही केली. याप्रकरणी पोलिसांनी भूरी आणि माक, अमर सिंह आणि ओमपाल यांना अटक करून तुरूंगात पाठवले आगे.
आपला आठ वर्षांचा मुलगा अंकित, 2 जुलैपासून बेपत्ता आहे अशी तक्रार कल्याण नावाच्या व्यक्तीने बदलपूर पोलिस ठाण्यात 5 जुलै रोजी दाखल केली होती.
त्यानंतर अंकितचा शोध घेण्यात आला असता 7 जुलै रोजी त्याचा मृतदेह संभल जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला सापडला होता. प्रथम अंकितला विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु तेव्हा त्याचा मृत्यू न झाल्याने त्याला पाण्यात फेकून देण्यात आल्याचे पोस्टमॉर्टममध्ये आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.