मध्य रेल्वेचे मोटरमन रामेश्वर मीना यांचा रूळ ओलांडताना लोकलची धडक बसल्याने मृत्यू

| Updated on: Feb 08, 2023 | 8:32 AM

मध्य रेल्वेचे मोटरमन रामेश्वर मीना यांचा काल रात्री विद्याविहार येथे रेल्वे रूळ ओलांडताना लोकलची धडक बसल्याने मृत्यू झाला, त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाल्याने त्यांचा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.

मध्य रेल्वेचे मोटरमन रामेश्वर मीना यांचा रूळ ओलांडताना लोकलची धडक बसल्याने मृत्यू
motorman meena
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : मध्य रेल्वेचे मोटरमन रामेश्वर मीना यांचा विद्याविहार येथे काल रात्री रुळ ओलांडताना लोकलने उडविल्याने मृत्यू झाला आहे. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले, परंतू डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मीना यांना मध्य रेल्वेच्या लोकल मोटरमन विभागातून लांबपल्ल्यांच्या गाड्यांचे इंजिन ड्रायव्हर म्हणून ( लोको पायलट ) नियुक्त करण्यात आले होते.

मध्य रेल्वेचे मोटरमन रामेश्वर मीना ( वय ५३ ) हे काल रात्री नऊच्या सुमारास विद्याविहार येथील लोकोशेडमध्ये जात असतानाच त्यांचा अंदाज चुकल्याने त्यांना भरधाव लोकलची जबर धडक बसली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली. जखमी अवस्थेत त्यांना राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.

रामेश्वर मीना हे मध्य रेल्वेचे मोटरमन होते. नुकतेच त्यांना लोकलच्या मोटरमन विभागातून लांबपल्ल्यांच्या गाड्यांचे इंजिन ड्रायव्हर म्हणून ( लोको पायलट ) नियुक्त करण्यात आले होते. लोको पायलटची ड्यूटी बजावण्यासाठी ते विद्याविहार येथील लोको शेडमध्ये काल रात्री जाण्यासाठी रूळ ओलांडत असताना त्यांना भरधाव लोकलची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. मोटरमन मीना यांना जखमी अवस्थेत राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्यांना तपासून मृत घोषीत गेले. मीना हे रेल कामगार सेनेचे सदस्य होते. मोटरमनच्या समस्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांच्या मृत्यूने रेल कामगार सेनेने दु:ख व्यक्त केले आहे.

दररोज सरासरी 8 ते 10 जणांचा मृत्यू

लोकल अपघातात दररोज सरासरी 8 ते 10 जणांचा मृत्यू होत असतो. तर दरवर्षी मुंबई उपनगरीय लोकल अपघातात अडीच हजार प्रवाशांचा मृत्यू तर तितकेच प्रवासी जखमी होत असतात अशी आकडेवारी सांगते. मुंबई उपनगरातील या बळींमध्ये सर्वाधिक मृत्यू रेल्वे रुळ धोकादायकपणे ओलांडल्याने होत असतात. सन 2022 मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना 577 पुरूषांचा तर 77 महीलांचा मृत्यू झाला आहे.

रेल्वे रुळ ओलांडताना साल 2022 मध्ये झालेले मृत्यू 

महिलांचा मृत्यू  : 77
पुरूषांचा मृत्यू  : 577