Mumbai Crime : ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून ‘नको ते धंदे’.. पोलिसांनी केला पर्दाफाश

| Updated on: Nov 06, 2023 | 2:18 PM

ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून देहव्यापाराचे रॅकेट चालवणाऱ्याचं पितळ पोलिसांनी उघडं पाडलं. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime : ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून नको ते धंदे.. पोलिसांनी केला पर्दाफाश
Follow us on

मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : कधी सलूनच्या नावे तर कधी आणखी कोणत्या माध्यमातून,  देहव्यापाराचे रॅकेट चालवणारे अनेक जण वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत नको ते धंदे करत असतात. मात्र मुंबईत या गुन्हेगारांनी नवाच फंडा आपलासा केल्याचे उघड झाले. चक्क ऑनलाइन अ‍ॅप्सच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवण्यात येत होते. अखेर वर्सोवा पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून तनिषा कनोजिया,रुद्र राऊत आणि तमन्ना खान अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांची अधिक चौकशी सुरू असून यामध्ये त्यांच्यासोबत आणखी कोणी सहभागी होते का याचाही शोध घेतला जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तनिषा कनोजिया ही महिला ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत होती. त्यासाठी तिने तंत्रज्ञान आणि तिचे मित्र यांची मदत घेतली. त्यासाठी तिने तिच्या साथीदारांच्या मदतीने प्ले स्टोअरवर एक अ‍ॅप तयार केले होते.

मोबाईलवर हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर युजर्सना ते वापरण्यासाठी कॉईन्स खरेदी करावी लागायची. १ हजार रुपयांपासून ते तब्बल ६२ हजार रुपयांपर्यंतची ही कॉईन्स होती. त्या खरेदीनंतर युजरला एक लिंक पाठवण्यात यायची.

त्या लिंक वर क्लिक केलं की ऑनलाइन माध्यमातून लाइव्ह सेक्स व्हिडीओ दाखवण्यात यायचे. दररोज सुमारे अर्ध्या तासाचे व्हिडीओ या अ‍ॅपवर दाखवले जात होते.जास्तीत जास्त ग्राहकांना या अ‍ॅपकडे आकर्षित करण्यासाठी त्या अ‍ॅपची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही जाहिरात करण्यात येत होती.

त्यासंदर्भात वर्सोव पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली . त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी तनिषाच्या घरी छापा मारला असता, तेथे अश्लील कृत्य सुरू असल्याचे आढळून आले. तेव्हा पोलिसांनी तिघांनाही बेड्या ठोकत अटक केली. झटपट पैसे कमावण्याच्या नादात हे रॅकेट चालवले जात होते, अशी माहिती समोर आली आहे.