अंडरवेअरमध्ये सोनं लपवलं, त्यांना वाटलं कुणालाच कळणार नाही! पण कळलंच, कसं?

| Updated on: Oct 12, 2022 | 2:41 PM

1.3 कोटी पेक्षाही जास्त किंमतीचं सोन अंडरवेअरमध्ये लपवलं! ती,तो ऐटीत विमानतळावरुन निघाले, पण...

अंडरवेअरमध्ये सोनं लपवलं, त्यांना वाटलं कुणालाच कळणार नाही! पण कळलंच, कसं?
दोघांना अटक...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : चक्क अंडरवेअरमध्ये सोनं लपवल्याप्रकरणी (Gold Hide in Underwear) दोघा जणांना अटक करण्यात आली. एअर इंटेलिजन्स युनिटने ही अटकेची (Arrest) कारवाई केली. दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दोघांना बेड्या ठोकण्यात (Mumbai crime News) आल्या आहेत. त्यांच्याकडे आढळून आलेल्या सोन्याची किंमत ही तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त असल्याची माहिती समोर आलीय. अंडरवेअरमधून सोनं लपवून आपण बिनधास्त बाहेर येऊ शकू आणि कुणालाच याबाबत काही कळणार नाही, असं दोघांना वाटलं होतं. पण अखेर या दोघाही आरोपींचं बिंग फुटलंय. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एक महिला आहे.

कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने केलेली ही मोठी कारवाई मानली जाते आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्यांवर कस्टम विभागाकडून बारीक नजर ठेवली जात होती. या कारवाईचाच हा एक महत्त्वपूर्ण भाग होता. अंडरवेअरमध्ये सोनं लपवून विमानतळाबाहेर येण्याच्या प्रयत्नात असलेल्यांच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्यात.

हे सुद्धा वाचा

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी एआययू (एअर इंडेलिजन्स युनिट) च्या पथकाने दोघांना ताब्यात घेतलं. या दोन्ही आरोपींची नावं आणि त्यांची राहण्याची ठिकाणही समोर आली आहेत. दोन्ही आरोपींच्या डिजीटल प्रोफाईलच्या आधारे अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींमध्ये एक 62 वर्षीय वृद्ध महिलेचाही समावेश आहे. या महिला आरोपीचं नाव नईमा अहमद उल्दय असं आहे. त्या मुंबईतील राहणाऱ्या आहेत. दुबईतून त्या मुंबईत आल्या होत्या.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सोन लपवून नेण्यासाठी केलेली कृती अखेर पकडली गेलीय. 1 किलो 290 ग्रॅम इतकी सोन्याची पावडर नोरा यांनी आपल्या अंडरगारमेन्टमध्ये लपवली होती. त्याची किंमत 63 लाख 20 हजार इतकी असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, दुसऱ्या एका कारवाईत मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचा रहिवासी असलेला रज्जद नोरे यालाही एआययूच्या पथकानं अटक केलीय. सज्जादकडे 1 किलो 284 ग्रॅम इतकी सोन्याची पावडर आढळून आली. याची किंमत 62 लाख 88 हजार इतकी असावी, असा अंदाज बांधला जातोय. या दोघांच्या अटकेतून एक कोटी 30 हजार पेक्षा जास्त रुपये किंमतीचं अडीच किलो सोनं जप्त करण्यात आलंय. याप्रकरणी आता पुढील तपास केला जातोय.