अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernarth Crime News) एका वृद्ध महिलेला गंडा घालण्यात आलाय. धान्यवाटप सुरु असल्याचा बहाणा करत एका महिलेला भामट्यांनी लुटलं. या महिलेच्या अंगावरील सात तोळे सोन्यासह (Gold Theft) एकूण 32 हजार रुपयांची रोकड चोरट्यंना लांबवली. या घटनेप्रकरणी पोलिसांत (Ambernarth Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्ध महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर आता पोलिसांकडून भामट्यांचा शोध घेतला जातोय. या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात खळबळ उडाली आहे. सुनिता ठाणगे या महिलेसोबत हा प्रकार घडला असून सुनिता याचं वय 62 वर्ष आहे. गुरुवारी सकाळी स्टेट बँक इंडियाच्या शाखेत त्या गेल्या होत्या. तिथून परतताना त्यांच्यासोबत ही घडना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून त्यात एक जण या महिलेला धान्यवाटप सुरु असल्याची बतावणी करत असल्याचं दिसून आलंय. या चोरट्याने टोपी घातली असून त्याचा चेहराही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय.
सुनिता ठाणगे ही 62 वर्षीय वृद्ध महिला अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात राहते. ही महिला आज सकाळी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेलली असता तिथून त्यांनी 32 हजार रुपये काढले. त्यानंतर त्या शिवाजी चौकातून भाजीपाला खरेदी करून रिक्षा पकडण्यासाठी जात होत्या. याचवेळी एक इसम त्यांच्याजवळ आला आणि पुढे एक गुजराती माणूस धान्यवाटप करत असल्याची बतावणी केली.
#Watch : धान्यवाटप सुरु असल्याचं सांगत वृद्ध महिलेला लुटलं! अंबरनाथमधील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, किती भोळी असतात ना लोकंसुद्धा? VC : निनाद करमरकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अंबरनाथ pic.twitter.com/DhKsx6upUt
— Siddhesh Sawant (@ssidsawant) August 26, 2022
हा भामटा या महिलेला सागर ज्वेलर्स, सॅमसंग शॉपच्या बाजूच्या गल्लीत घेऊन गेला. तिथे असलेल्या त्याच्या साथीदाराने गुजराती शेठला दागिने आवडत नसल्यानं दागिने काढून पिशवीत ठेवायला या महिलेला सांगितलं. त्यानुसार या महिलेनं 5 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, 2 तोळे वजनाची सोन्याची चैन आणि बँकेतून काढलेली 32 हजारांची रोख रक्कम या पिशवीत टाकली. हीच पिशवी घेऊन हे चोरटे पसार झाले.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेतायत. स्थानिक लोकांची चौकशी करुन चोरट्यांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. तसंच आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्यास मदत मिळते का, याचीही पाहणी आता पोलिसांकडून केली जाते आहे.