मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणार अनिल देशमुख आरोपी आहे. त्यांना आधी ईडीने अटक केली होती. दरम्यान, ईडी प्रकरणी अनिल देशमुख यांना आधीच जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, आता सीबीआय प्रकरणातही अनिल देशमुख यांना जामीन मिळतो का? हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हायकोर्टाने न्यायाधीश एम.एस कर्णिक यांचं खंडपीठ अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज निकाल देण्याची शक्यताय.
अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु असून ते अजूनही अटकेतच आहेत. ईडीकडून जामीन मिळाल्यानंतरही अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नव्हती.
सीबीआय प्रकरणातील गुन्ह्यांमुळे अनिल देशमुख यांनी पुन्हा कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. आता ईडीनंतर अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणातील दिलासा मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
100 कोटी वसुली प्रकरणाचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला होता. या वसुली प्रकरणी आरोपी सचिव वाझे माफीचा साक्षीदार बनलाय. देशमुखांच्या सांगण्यावरुनच बार मालकांकडून वसुली केली असल्याचा जबाब सचिन वाझे यानं केला होता. दरम्यान, आपल्यावरील सर्व आरोप अनिल देशमुख यांनी फेटाळून लावले होते.