मुंबई: इंधन दरवाढीविरोधात बैलगाडीतून आंदोलन करत असताना बैलगाडी तुटली. त्यामुळे बैलांना इजा झाल्याने एका प्राणी मित्र संघटनेने काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जगताप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (animal organization lodge complaint against bhai jagtap)
जीवदया अॅनिमल वेल्फेअर ऑर्गनायझेशन या प्राणी मित्र संघटनेने आज सकाळी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात जाऊन भाई जगताप यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी या संस्थेने केली आहे.
कालच्या काँग्रेसच्या इंधन दरवाढीविरोधातील आंदोलनात दोन बैलांच्या मानेला जखम झाली आहे. जगताप यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते बैलगाडीवर चढले होते. यावेळी कार्यकर्ते एकमेकांना ढकलत होते. बैलगाडीत सर्व दाटीवाटीने चढले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या वजनाने बैलगाडी तुटली आणि दोन्ही बैलांच्या मानेला प्रचंड जखम झाली. हा एक प्रकारे बैलांचा छळच होता. त्यामुळे या सर्वांवर वन्य प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
काल भाई जगताप यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलं. या बैलगाडीवर उभे राहून काँग्रेस कार्यकर्ते तसेच भाई जगताप केंद्र सरकारविरोधात घोषणा देत होते. तसेच “देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो !” अशासुद्धा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त लोक या बैलगाडीवर चढल्यामुळे ती जागेवरच तुटली. परिणामी कांग्रेस कार्यकर्तेही खाली कोसळले. बैलगाडीमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हेसुद्धा उभे होते. बैलगाडी अचानकपणे तुटल्यामुळे तेसुद्धा जमिनीवर कोसळले. (animal organization lodge complaint against bhai jagtap)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 July 2021 https://t.co/3tPv9V02EI #News #Bulletin #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 11, 2021
संबंधित बातम्या:
भाजपचे कार्यकर्ते पुन्हा शिवसेना भवनावर धडकण्याची शक्यता; शिवसैनिकांचा कडेकोट बंदोबस्त
सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त, विनायक राऊतांची मोठी घोषणा
(animal organization lodge complaint against bhai jagtap)