Video | ‘गाडी के पायदान’ आणि फलाटामधील अंतरावर लक्ष द्या! लक्ष न देण्याऱ्यांचं काय होतं? बघा CCTV

| Updated on: Feb 07, 2022 | 8:52 PM

गाडीचं पायदान आणि फलाटावरील अंतराकडे ध्यान देऊन मगच गाडीच चढावं, असंही वारंवार घोषणा रेल्वेच्या वतीनं केल्या जात असतात. मात्र अनेकदा प्रवाशांची घाई नडते.

Video | गाडी के पायदान आणि फलाटामधील अंतरावर लक्ष द्या! लक्ष न देण्याऱ्यांचं काय होतं? बघा CCTV
कल्याण रेल्वे स्थानकाती थरारक सीसीटीव्ही
Follow us on

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील (Kalyan Railway Station CCTV) एक थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर चारवर धक्कादायक प्रकार घडला. एक प्रवासी धावती ट्रेन (Running Train) पकडण्यासाठी पुढे आला. पण प्रयत्न फसला. जीव जाणार अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पाय घसरला आहे. धावत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्येच हा प्रवासी (Tragedy with Railway passenger) अडकला गेला. धक्कादायक गोष्ट म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन सुटली होती. त्यामुळे प्रवाशाला बाहेर पडता येण्याचा कोणताच मार्ग सापडेना. रेल्वेच्या चाकांनी शरिराचे तुकडे होतील की काय, अशीच अवस्था या प्रवाशाची झाली होती. पण या प्रवाशाचा जीव अगदी थोडक्यात बचवाल आहे. सोमवारी (7 फेब्रुवारी, 2022) सायकाळच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानं प्लॅटफॉर्मवरील इतरही प्रवशांची घाबरगुंडी उडाली होती.

नेमकं काय घडलं?

धावती रेल्वे पकडण्याचा नाद एका प्रवाशाच्या अंगलट आला.या प्रवाशानं कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी चारच्या सुमारास कुर्ला-पाटणा एक्स्प्रेस पकडताना प्रवाशाला धावत्या ट्रेनमध्ये चढणं जीवावर बेतणारच होतं. धावती ट्रेन पकडताना या प्रवाशाचा पाय घसरला आणि हा प्रवाशी थेट प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या पायऱ्यांच्या मध्ये अडकला.

चिंताजनक बाब म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन सुटली होती. गाडीनं वेग पकडायला सुरुवात केली होती. दरम्यान, तितक्यात या प्रवाशाची धडपड एका आरीएफ जवानानं पाहिली. सोहनलाल इटाव असं या आरपीएफ जवानाचं नाव आहे. वेळीच सोहनलालनं या प्रवाशाकडे धाव घेतली आणि त्याला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय. आरपीएफ जवान सोहनलाल इटावचं कौतुक करावं तेवढं कमी, अशी प्रतिक्रिया नंतर रेल्वे स्थानकावर असलेल्या इतर प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

अनेकदा प्रवाशांना आवाहन करुनही धावती रेल्वे पकडण्याचा नाद जीवावर बेततो. इतकंच काय तर गाडीचं पायदान आणि फलाटावरील अंतराकडे ध्यान देऊन मगच गाडीच चढावं, असंही वारंवार घोषणा रेल्वेच्या वतीनं केल्या जात असतात. मात्र अनेकदा प्रवाशांची घाई नडते आणि कल्याण स्थानकात जो प्रकार घडला, तसे प्रवास वारंवार घडताना पाहायला मिळतात. दैव बलवत्तर म्हणूनच या प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचलाय. सोहनलाल इटाव हा आरपीएफ जवान जर वेळीच तिथं तैनात नसता, तर मात्र किती मोठा अनर्थ घडला असता, याची कल्पनाच केलेली बरी!

पाहा थराराक घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ :

Video | हा पिक्चरचा सीन नाही, पण पिक्चरच्या सीनपेक्षा कमीही नाही…

पिस्तुलाच्या धाकाने पाच दरोडेखोर शिरले, मुलुंडमध्ये व्यावसायिकाच्या कार्यालयात 76 लाखांची लूट

कोंबड्या नेणाऱ्या टेम्पोची बाईकला समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू