डोंबिवली (ठाणे) : कल्याण डोंबिवलीत रस्त्यांमध्ये इतके खड्डे झालेत की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. हेही असे की थोडके शहरात चोरट्यांचाही प्रचंड सुळसुळाट आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहनचालकांचा अपघात होऊ नये यासाठी एका दक्ष नागरिकाने झाडाची कुंडी खड्ड्यात ठेवली. मात्र या झाडाची कुंडीदेखील एका रिक्षाचालकाने चोरली. संबंधित प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. डोंबिवलीतील घरडा सर्कल परिसरात हा प्रकार घडला आहे.
डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल परिसरात असलेल्या रस्त्यावर एक भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात व्हायचे. या अपघातापासून वाहन चालकांना वाचवण्यासाठी महेश चव्हाण नावाच्या एका हॉटेल व्यावसायिकाने हा खड्डा माती आणि खडीच्या वापर करत बुजवला होता. पावसाच्या पाण्याने माती आणि खडी वाहून गेली. नंतर चव्हाण यांनी या ठिकाणी टायरचा ट्यूब ठेवला. तो सुद्धा कोणीतरी चोरुन नेला.
त्यानंतर चव्हाण यांनी खड्ड्यापासून वाहनचालकांना जागृत करण्यासाठी या खड्ड्यात झाडाची कुंडी ठेवली. ती कुंडी सुद्धा एका रिक्षाचालकने चोरली. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. एकीकडे महानगरपालिका प्रशासन रस्त्यावरील खड्डे भरत नाही, दुसरीकडे या खड्ड्यांपासून नागरिकांच्या अपघात होऊ नये यासाठी एका जागरुक नागरिकाने पुढाकार घेतला तर असा प्रकार समोर येतोय.
VIDEO : केडीएमसी एकीकडे खड्डे भरत नाही, अपघात टाळण्यासाठी लावण्यात आलेली झाडाची कुंडी चोरटे सोडत नाही, कल्याण डोबिंवलीतील प्रकार #CCTV #Kalyan #Dombivli pic.twitter.com/S0LlGMoUhU
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2021
कल्याण डोंबिवलीत चोरांचा प्रचंड सुळसुळाट बघायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून चोरांनी घरं-दुकानांना लक्ष्य केले आहे. ‘हेही असे की थोडके’ त्यांचं धाडस आता थेट एटीएम मशीन फोडून पैसे लंपास करण्यापर्यंत पोहोचलं आहे. डोंबिवलीत तर मंगळवारी (7 सप्टेंबर) मध्यरात्री एका चोरट्याने तब्बल दोन एटीएम मशीन फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने त्याचा तो प्रयत्न हाणून पडला. काही सतर्क नागरिकांना चोराची चाहूल लागताच त्यांनी पोलिसांना त्याच्या दुष्कृत्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि चोर यांच्यात चांगलाच पकडा-पकडीचा खेळ रंगला. अखेर पोलिसांना या चोराच्या मुसक्या आवळण्यात यश आलं. डोंबिवलीच्या टिळकनगर परिसरात रात्रभर हा सगळा थरार सुरु होता.
डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्रीच्या वेळेस चोरट्याने एक एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला एटीएम मशीन फोडण्यात अपयश आले. त्यानंतर या चोरट्याने रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील टिळक चौकातील आयआयसीआय बँकेच्या एटीएमला लक्ष्य केले. पण इथेही त्याने भरपूर प्रयत्न करुन देखील तो एटीएम फोडू शकला नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला.
हेही वाचा :
आईच्या भेटीसाठी गेला, रात्री मुक्कामाला थांबला, पण घरातच डोकं ठेचून हत्या, हत्येमागचं गूढ नेमकं काय?