मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला कुटुंबीयांकडून 4500 रुपयांची मनी ऑर्डर आली आहे. कारागृह प्राधिकरणाकडे ही मनी ऑर्डर पाठवावी लागते. हे पैसे आर्यनच्या कँटीनच्या खर्चासाठी कूपनच्या स्वरुपात दिले जातात. जेल मॅन्युअलनुसार, कोणत्याही कारागृहातील आरोपीला महिन्यातून एकदा मनीऑर्डर मिळू शकते, जी साडेचार हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
खान कुटुंबासाठी कठीण काळ
अभिनेता शाहरुख खानसाठी 15 दिवस खूप कठीण गेले आहेत. अंमली पदार्थ प्रकरणात मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुख खान आणि गौरी खान हे आर्यनला जामिनावर बाहेर काढण्याचा हरप्रकारे प्रयत्न करत आहेत. त्यातच शाहरुख खानची लेक सुहाना खान बऱ्याच दिवसांपासून मुंबईत नाही. सुहाना खान आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी बऱ्याच काळापासून न्यूयॉर्कमध्ये आहे. मात्र, 3 ऑक्टोबर रोजी ड्रग्ज प्रकरणात भाऊ आर्यन खानच्या अटकेनंतर सुहाना खान आई गौरी खान आणि वडील शाहरुख खान यांच्या सतत संपर्कात आहे.
सुहाना खानलाही न्यूयॉर्कहून थेट मुंबईला यायचे होते. वडील शाहरुख खान यांनी तिला सध्या घरी परतण्यास मज्जाव केला आहे. एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, सुहाना खान तिचा भाऊ आर्यनच्या जामिनाबाबत त्याची आई गौरी खान आणि वडील शाहरुख खान यांच्याकडून सतत अपडेट घेत आहे.
शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानसुद्धा अशा स्थितीत आजारी पडल्याचे माध्यमांच्या अहवालात समोर आले आहे. भावाच्या अटकेनंतर सुहाना खानने भारतात परतण्याचा प्रयत्न केला. पण शाहरुख आणि गौरीने त्याला परत न येण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे, शाहरुख खान आणि गौरी खान यांच्यासाठी सध्याची परिस्थिती खूपच कठीण असल्याचेही सांगण्यात आले. शाहरुख आणि गौरी ना खाऊ शकत ना झोपू शकत आहेत.
दुसरीकडे, शाहरुख आणि गौरीने त्यांचा लहान मुलगा अब्रामलाही या प्रकरणापासून दूर ठेवले आहे. दरम्यान, अब्रामला त्याच्या शाळेच्या बाहेर पापाराझींनी हसताना कॅमेऱ्यात कैद केले होते. आर्यन खान मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम असताना फार कमी जेवत आहे. तसेच, त्याला फार जास्त झोपही लागत नाही.
ड्रग्ज प्रकरणात अडकलेला आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्या जामिनावर त्याचे वकील गेल्या अनेक दिवसांपासून कठोर परिश्रम घेत आहेत. परंतु, प्रत्येक वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) काही ना काही पेचात अडकवत आहे. 11 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात आर्यनचा जामीनही रद्द करण्यात आला.
आतापर्यंत, NCB ने या प्रकरणात अनेक लोकांची चौकशी केली आहे आणि त्यांचा तपास अजूनही सुरू आहे. 9 ऑक्टोबर रोजी एनसीबीने आर्यन खानच्या ड्रायव्हरची 12 तास चौकशी केली होती. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने आर्यन आणि अरबाज मर्चंटला क्रूझ टर्मिनलवर सोडण्याची कबुली दिली होती. आर्यन आणि त्याच्या मित्रांच्या हालचालींबाबतही चालकाची चौकशी करण्यात आली होती.
भाऊ आर्यन खान अटकेत, तर लेक सुहानाची आई गौरीसाठी बर्थडे पोस्ट! शुभेच्छा देताना म्हणाली…