मुंबई : बऱ्याच ठिकाणी मसाज सेंटर सुरू करण्यात आले. शरीर हलकं होते म्हणून मसाज केली जाते. मसाज कुणाकडून कारायची याचे पैसे घेतले जातात. काही ठिकाणी मसाज सेंटरच्या नावावर फसवणूक केली जाते. अशीच एक घटना उघडकीस आली. मसाजच्या करण्याच्या बहाण्याने ग्राहकाला बोलावलं जायचं. त्यांना लुटणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांना गुन्हा घडल्यानंतर केवळ दोन तासात अटक केली.
वाकोला पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा 397, 395 आदी कलम खाली दाखल करण्यात आला होता. यात जयेश नावाचे व्यक्ती तक्रारदार आहेत. जयेश यांना 7 जुलै रोजी संध्याकाळी बाबा होम्स या हॉटेलात मसाज करण्यासाठी बोलावण्यात आले होते.
जयेश तिथे पोहचल्यावर त्यांना बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आलं. यावेळी त्याच्या खात्यातील रक्कम आरोपींनी आपल्या खात्यात ट्रान्सफर केली. यावेळी हॉटेलमध्ये चार आरोपी होते. नीलेश सरोज, विशाल सिंग, आदित्य सरोज, सुरेश सरोज हे आरोपी होते.
तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तांत्रीक तपासात आरोपी हे अंधेरी स्टेशन येथे असल्याचं लक्षात आले. पोलिसांनी सापळा लावून त्यांना अटक केली. चौकशीत त्यांचे आणखीही काही साथीदार आल्याचं उघडकीस आले. त्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. कुलदीप सिंग, सुरेश विश्वकर्मा आणि सोपान कुमार अश्विनीकुमार यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि 10 हजार रुपये जप्त करण्यात आलेत.
मसाजच्या नावावर कुठं काय असेल काही सांगता येत नाही. त्यामुळे सहानिशा करूनच मसाज सेंटरवर जावे. अन्यथा फसवणुकीच्या शक्यता आहे.