Salim Fruit : छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुटला 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी, दाऊद इब्राहिमसाठी फंड गोळा केल्याचा आरोप

| Updated on: Aug 05, 2022 | 8:35 PM

सलीमवर बिल्डर्सकडून फ्लॅट बळजबरीने घेऊन विकणे आणि त्यातून मिळालेले पैसे टेरेर फंडिंगसाठी कोट्यवधी रुपये सलीम याने दाऊद गॅंगला पाठविल्याचा एनआयएचा आरोप आहे. एकूण 5 बिल्डरांनी सलीमच्या विरोधात NIA कडे आपला जबाब नोंदवला आहे.

Salim Fruit : छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुटला 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी, दाऊद इब्राहिमसाठी फंड गोळा केल्याचा आरोप
एनआयएकडून अटक टाळण्यासाठी सलीम फ्रूटकडून 50 लाख उकळले
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी फंड गोळा करणाऱ्या सलीम फ्रुट (Salim Fruit) याला मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाने 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी (NIA Custody)त पाठविण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी सलीम याला मुंबईतून एनआयए अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यानंतर आज सलीम याला रिमांडसाठी विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आले होते. सलीमवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim)साठी फंड गोळा करण्याचा गंभीर आरोप आहे. टेरर फंडिंगसाठी सलीम हा पैसे पाठवत असल्याचाही आरोप सलीमवर आहे. सलीम फ्रुट हा गँगस्टर छोटा शकिलचा साडू असल्याची माहिती मिळते.

टेरर फंडिंगसाठी कोट्यवधी रुपये दाऊदला पाठवल्याचा आरोप

सलीमवर बिल्डर्सकडून फ्लॅट बळजबरीने घेऊन विकणे आणि त्यातून मिळालेले पैसे टेरर फंडिंगसाठी कोट्यवधी रुपये सलीम याने दाऊद गॅंगला पाठविल्याचा एनआयएचा आरोप आहे. एकूण 5 बिल्डरांनी सलीमच्या विरोधात NIA कडे आपला जबाब नोंदवला आहे. NIA सलीमच्या बँक एकाउंट्स फॉरेंसिक ऑडिट करणार आहे. NIA चा आरोप आहे की, लेयर्ड ट्रान्सेक्शन झालं आहे, त्याची चौकशी करण्याची गरज आहे. सलीमच्या घरातून अनेक लोकांच्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे मिळाली आहेत. सलीमच्या घरातून लाखो रुपयांचे परदेशातून स्मगलिंग केलेले सिगरेटही मिळाले आहेत. सलीमशी निगडित कागदपत्रे जवळपास 10000 पेजची आहेत आणि tera बाइट्समध्ये डाटा आहेत, त्याबाबत चौकशी करायची आहे. सलीमला साक्षीदारांसमोर बसवून confrontation करून चौकशी करायची आहे, अशी मागणी एनआयएने केली आहे.

कोण आहे सलीम फ्रुट ?

सलीम फ्रुट हा छोटा शकीलचा साडू आहे. शकील आपल्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो. सलीम फ्रुटला 2006 मध्ये युएईमधून भारतात पाठवण्यात आले होते आणि 2010 पासून तो तुरुंगात होता. सलीम फ्रुट याची यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ईडीकडून चौकशी करण्याकरीता ताब्यात घेण्यात आले होते. सलीम फ्रूट याचा जबाब नोंदविल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. सलीम फ्रुटशिवाय दाऊद इब्राहिमचा मेहुणा सौद युसूफ तुंगेकर, दाऊदचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरचा साथीदार खालिद उस्मान शेख आणि दाऊदची दिवंगत बहिण हसिना पारकरचा मुलगा आलीशान पारकर यांचेही जबाब नोंदवले जाऊ शकतात. सलीम फ्रुट विरोधात मुंबईतील अनेक पोलीस स्टेशनमध्ये खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत चीन, बँकॉक, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि तुर्कस्तानसह किमान 17 ते 18 देशात सलीम फ्रुट जाऊन आला आहे.  (Chhota Shakeels relative Salim Fruit in NIA custody till August 17)

हे सुद्धा वाचा