कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई : चर्चगेट रेल्वे स्टेशनवर (Churchgate Railway Station) एक धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलंय. एका दाम्पत्यामध्ये (Husband Wife Dispute) झालेला वाद टोकाला गेला. यातून पतीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात त्याने पत्नीला चाकूने भोसकलं. या घटनेत पत्नी गंभीररीत्या जखमी झालीय. रविवारी घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर पतीला अटकही (Mumbai Crime News) केली. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.
रोशन नाईक आणि हेमा नाईक अशी या नवरा बायकोची नावं आहेत. ते पालघरचे रहिवासी आहेत. ते एका घरगुती कार्यक्रमासाठी कुलाब्याला आले होते. या कार्यक्रमावरुन घरी परतत असताना त्यांच्या वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला ही रोशन यांनी थेट हेमाची हत्या करण्याचा कट आखला.
चर्चगेट रेल्वे स्थानकात त्यांनी हेमाला चाकूने भोसकलं. यात हेमा गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. या घटनेनं रेल्वे स्थानकातील इतर प्रवाशांचीही घाबरगुंडी उडाली होती.
या घटने रेल्वे पोलिसांनी तत्काळ गंभीर दखल घेतली. आरोपी रोशन यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चर्चगेट रेल्वे पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जातोय.
कुलाबा इथं एका घरगुती कार्यक्रमासाठी रोशन आणि हेमा आले होते. दुपारच्या सुमारास हेमा नाईकचे कुटुंबीय आणि रोशन नाईक यांच्या काही कारणावरुन वाद झाला आणि रोशन कार्यक्रमातून निघून गेला. यानंतर रोशन चर्चेगेट रेल्वे स्थानक गेला. तिथे तो पत्नी हेमाची वाट पाहत होता.
कार्यक्रम संपल्यानंतर हेमा देखील घरी जाण्यासाठी निघाली. हेमा कधी येते, याची वाटत रोशन रेल्वे स्थानक पाहत थांबला होता. पालघरला घरी जाण्यासाठी जेव्हा हेमा चर्चगेट रेल्वे स्थानकात पोहोचली, त्यावेळी रोशन याने टोकाचं पाऊल उचललं. त्याने भर रेल्वे स्थानकात मागचा पुढचा विचार न करता पत्नी हेमा यांना चाकूने भोसकलं.
पतीनं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात हेमा गंभीर जखमी झाल्यात. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलंय. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.