डोंबिवली : डोळ्यात मिरचीपूड (Chilli power) टाकून व्यापाऱ्याला लुटल्याची घटना डोंबिवलीत (Dombivli) घडलीये. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना (two theft arrested) बेड्या ठोकल्या आहेत. 19 एप्रिलला ही लुटमारीची घटना घडली होती दोघे जण एका व्यापाऱ्याच्या दुकानात घुसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर मिरचीपूड व्यापाऱ्याच्या डोळ्यात फेकली. त्यानंतर व्यापाऱ्याची बॅग घेऊन दोघांनीही पळ काढला. या दोन्ही लुटमार करणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एक जण बॅग घेऊन पळ काढत असल्याचं दिसलंय. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी तपास मोहीत राबवली. अखेर दोघाही लुटारुंना पोलिसांनी शोधून काढत त्यांना अटकही केली आहे.
डोंबिवलीच्या आयरे रोडवर राहणारे गांगजी गोसर यांचा खाकऱ्याचा व्यवसाय आहे. मंगळवारी 19 एप्रिल रोजी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास ते पी अँड टी कॉलनीतील त्यांच्या खाकऱ्याच्या कारखान्यात गेले. तिथून दिवसभराची जमा झालेली 35 हजारांची रक्कम बॅगेत घेऊन ते निघत होते.
याचवेळी तिथे आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत पैसे असलेली त्यांची बॅग पळवली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. या फुटेजच्या आधारे मानपाडा पोलिसांनी जय भद्रा आणि जितेंद्र जोशी या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरलेले 14 हजार रुपये जप्त करण्यात आलेत. त्यांनी यापूर्वी असे काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करतायत.
मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घटना ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्यापारी बाहेर चालला होता. नेमके त्याचवेळी दोघे आरोपी चाकूसह घुसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवला. डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि पळ काढला.
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून आरोपी मुंबईच्या घाटकोपर परिसरातील असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. सध्या अटक करण्यात आरोपींची कसून चौकशी केली जाते आहे.