…आणि अभियंता 1 लाख घेताना रंगेहात पकडला गेला, फक्त अहवालासाठी प्रकल्पबाधिताकडून 5 लाखांची मागणी

| Updated on: Sep 13, 2021 | 11:16 PM

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता अविनाश भानुशाली याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे.

...आणि अभियंता 1 लाख घेताना रंगेहात पकडला गेला, फक्त अहवालासाठी प्रकल्पबाधिताकडून 5 लाखांची मागणी
अभियंत्याची फक्त अहवालासाठी प्रकल्पबाधिताकडून 5 लाखांची मागणी
Follow us on

कल्याण (ठाणे) : सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता अविनाश भानुशाली याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. एसीबीने सोमवारी (13 सप्टेंबर) दुपारच्या सुमारास कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचत आरोपी अभियंत्याला ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे भानुशालीने यापूर्वी 4 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याणमध्ये मुंबई-बडोदा महामार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादनाचे काम सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनींचे मुल्यमापन करुन अहवाल देण्याची कार्यवाही सुरु आहे. या दरम्यान एका बाधिताला अहवाल देण्यासाठी बांधकाम विभागाचा अभियंता अविनाश भानुशाली याने पाच लाखांची मागणी केली. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने अभियंत्याला 4 लाख रुपये दिले. पण भानुशाली हा आणखी एक लाखांची मागणी करत होते. ते मिळाल्याशिवाय आपण अहवाल देणार नाही, अशी मुजोर भूमिका त्याने घेतली.

एसीबीने कारवाई नेमकी कशी केली?

अखेर संबंधित व्यक्तीने ठाणे लाचलुचपत विभागाकडे याप्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडण्याचा निर्णय घेतला. लाचलुचपत विभागाने कल्याण शासकीय विश्रामगृहाच्या आवारात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचला. त्यानंतर अभियंता भानुशाली याला 1 लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडलं. एसीबी अधिकाऱ्यांनी भानुशालीला बेड्या ठोकल्या. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

कल्याणच्या तहसीलदाराला देखील रंगेहाथ अटक

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कल्याण तालुक्याचे तहसीलदार दीपक आकडे यांना लाचलुचपत विभागाने 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना पकडलं होतं. कल्याण तालुक्यातील वरप गावामधील एका बांधकाम कंपनीची जमीन विकसित करण्याचे काम कल्याण येथे सुरु आहे. या जमिनीबाबत हरकती सुनावणीचे काम कल्याण तहसील कार्यालयात पडताळणीसाठी सुरु होते. त्याचा अहवाल देण्यासाठी तहसीलदार दीपक आकडे (वय 45) आणि त्यांचा शिपाई बाबू उर्फ मनोहर हरड (वय 42) यांनी 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी केली होती.

याबाबत संबधित कंपनीच्या प्रशासनाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास 1 लाख 20 हजारांची लाच घेताना तहसीलदार आकडे आणि शिपाई हरड यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस यांनी रंगेहाथ अटक केली.

ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली निलिमा कुलकर्णी, संतोष शेवाळे, जयश्री पवार, विनोद जाधव, पद्माकर पारधी आदींच्या पथकाने ही कारवाई केली होती.

विशेष म्हणजे दिपक आकडे यांनी पनवेलचे तहसीलदार म्हणूनही काम पाहिले आहे. तहसीलदार दीपक आकडे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली कल्याण येथे झाली होती. जवळपास चार वर्ष ते पनवेल येथे कार्यरत होते.

हेही वाचा :

लग्नासाठी पठ्ठ्याने 80 हजार दिले, तरीही नवरी पळाली, पाण्याची बाटली आणायला सांगून गंडवलं !

धक्कादायक! आधी डोक्याचे केस धरून स्लॅपवर आदळलं, नंतर वीटच डोक्यात घातली, युवकाच्या हत्येनं औरंगाबाद हादरलं