कल्याण (ठाणे) : वडापाव, समोसा कुणाला आवडत नाही? आणि तुम्ही मुंबई, ठाणे सारख्या शहरांमध्ये असाल तर तुमच्यासाठी हे नेहमीचे ठरलेले पदार्थ. पण तुमचा आवडता हा समोसा नेमका कसा बनवला जातो? याचं नेहमी निरीक्षण नक्कीच करत जा. कारण काही खाद्य पदार्थ आपल्याला खायला आवडत जरी असले तरी नंतर त्या खाद्य पदार्थ्यांतून आपल्या शरीराला धोका होऊ शकतो. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे कल्याणच्या एका हॉटेलमधला समोसा बनविण्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ तुम्ही जर बघितला तर तुम्हीदेखील यॅक यॅक, ईsss असेच रिअॅक्शन द्याल. कारण तसाच तो व्हिडीओ आहे. त्यामुळे बाहेर हॉटेल किंवा वडापावच्या ठेल्यावर खाताना आधी त्या पदार्थाची गुणवत्ता चांगली आहे ना, तो पदार्थ कसा बनवला गेलाय याचं बाईकाईने निरीक्षण करा. कारण आजच्या घडीला आरोग्य हेच महत्त्वाचं आहे.
समोशाचे पीठ घामाने माखलेल्या मांडीवर ठेवून मळले जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ कल्याणमध्ये समोर आला आहे. कल्याणच्या काटेमानिवली चौकातील शंकर हॉटेलमध्ये अशाप्रकारे समोसे तयार केले जात होते. हा व्हिडीओ समोर आल्यावर पुन्हा एकदा नागरीकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे उघड झाले आहे.
कल्याण पूर्व भागात राहणारे भूषण पवार हे मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या समितीची रविवारी (17 ऑक्टोबर) एक बैठक होती. या बैठकीसाठी भूषण यांनी काटेमानिवली परिसरातील शंकर हॉटेलला समोशाची ऑर्डर दिली होती. समोसे घेण्यासाठी ते दुकानात गेले असता त्यांनी पाहिले की, दुकानातील दोन कर्मचारी त्याठीकाणी समोसे तयार करीत होते. समोसे तयार करण्यासाठी जे पीठ मळले जात होते ते चक्क घामाने माखलेल्या मांडीवर मळले जात होते.
हा प्रकार पाहताच भूषण यांनी त्याचा व्हिडीओ काढला. या प्रकरणात प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भूषण यांनी केली आहे. मात्र ज्याप्रकारे पीठ मळले जात होते ते पाहता नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. संबंधित व्हिडीओ व्हायर झाल्यानंतर प्रशासनाने त्वरीत या दुकानावर कारवाई करुन अन्य दुकानांचीही तपासणी केली पाहिजे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
देशासह जगावर सध्या कोरोनाचं संकट आहे. राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झालाय. पण तरीही धोका अजून टळलेला नाही. नियमित मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन तसेच स्वच्छता राखत आपल्याला या संकटातून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारकडून वारंवार विनंती केली जातेय. पण काहीजण या गोष्टींना गांभीर्याने घेताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या काही गोष्टी घडू नयेत म्हणूनच सरकारकडून हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. पण कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने सरकारने हॉटेल, वडापावच्या ठेल्यांना सुरु करण्यास परवानगी दिली. पण कल्याणमध्ये शंकर हॉटेलमध्ये अशाप्रकारचा प्रकार समोर येत असेल तर ते चिंताजनक आहे.
हेही वाचा :