मुंबई : आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी (Dharavi)मधील पिवळा बंगलाच्या बाजूला गावदेवी मंदिराजवळ सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळीबार (Firing) केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यार सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोहम्मद आरिफ उर्फ भैया (35) असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मोहम्मदवर 4 राउंड गोळीबार करण्यात आला. यापैकी मोहम्मदला तीन गोळ्या लागल्या. या हल्ल्यात मोहम्मद आरिफ उर्फ भैय्या गंभीर जखमी झाला. याप्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Firing by unknown persons in Dharavi Mumbai, Youth maijor injured in attack)
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मोहम्मद आरिफ उर्फ भैय्या हा शनिवारी सकाळी पिवळा बंगलाजवळ आला असता त्याच्यावर 2 अज्ञात व्यक्तींनी समोरून गोळीबार केला. गोळीबारात मोहम्मद आरिफवर 4 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी 3 गोळ्या मोहम्मद आरिफला लागल्या. त्यामध्ये चेहऱ्यावर, छाती आणि पाठीला प्रत्येकी एकेक गोळी लागली असून यामध्ये आरिफ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला लागलेल्या गोळ्या ऑपरेशन दरम्यान काढून टाकण्यात आल्याचे धारावी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत पाटील यांनी दिली.
मोहम्मद हा टेम्पो चालक होता आणि त्याच्या नावावर गुन्हा देखील आहे. तर परवेज बुटा आणि सलीम लंगडा यांनी गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना असून ह्या दोघांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याच्या तपासाकरीता गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस आणि काही पथके बनवण्यात आली असून आरोपींचा शोध सुरु आहे. मोहम्मद आरिफवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाच तपास सुरू केला असून दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्ला करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. डीसीपी प्रणय अशोक तसेच धारावी पोलिस स्टेशनचे सीनियर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. क्राईम ब्रँच या प्रकरणाचा समांतर तपास करत असल्याची माहिती क्राइम ब्रांच पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी घटनास्थळाची पाहणी करताना दिली. मात्र ही घटना वैयक्तिक वैमनस्यातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Firing by unknown persons in Dharavi Mumbai, Youth maijor injured in attack)
इतर बातम्या
Kalyan Crime : हरभरा चोरल्याच्या संशयातून मजुराला कुऱ्हाडीने मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद