एक-दोन नव्हे तर चक्क 26 कोटींची व्हेल माशाची उलटी, अंधेरी-मालाडमधून पाच जणांना बेड्या

| Updated on: Jul 12, 2021 | 6:55 PM

ठाणे वनविभागाच्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड येथून 5 जणांना ठाणे वन विभागाने अटक केली आहे.

एक-दोन नव्हे तर चक्क 26 कोटींची व्हेल माशाची उलटी, अंधेरी-मालाडमधून पाच जणांना बेड्या
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

ठाणे : ठाणे वनविभागाच्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड येथून 5 जणांना ठाणे वन विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल एक-दोन नाही तर चक्क 26 कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी जप्त केली आहे. व्हेल माशाची जप्त केलेली उलटी 26 किलो वजनाची आहे. या उलटीची तस्करीसाठी काही जण मालाड आणि अंधेरी येथे येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. शेकडो किलो व्हेल माशाची उलटी बाजारात तस्करी करता आणल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर वन विभागाने कारवाई केली.

व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी

व्हेल माशाची उलटी प्रकार अतिशय दुर्मिळ आहे. भारतीय बाजारात या व्हेल माशाच्या एक किलो उलटीची किंमत 1 कोटी रुपये आहे. तर आखाती देशात विशेष करून दुबई, त्याचबरोबर इंग्लंड आणि अमेरिका या देशात व्हेल माशाच्या या उलटीला प्रचंड मागणी आहे. एक किलो उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 3 ते 5 कोटी रुपयांपर्यंत दिली जाते.

व्हेल माशाची उलटी इतकी महाग का?

व्हेल माशाची ही उलटी समुद्राच्या पाण्यात बुडत नसून समुद्रातील असलेल्या क्षारमुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर तरंगते आणि गोळा होऊन वर्षभराचा प्रवास करून समुद्रकिनाऱ्यावर येते. अतिशय महागड्या सेंट-परफ्यूम, अगरबत्ती याचबरोबर सुगंधी द्रव्यात या व्हेल माशाच्या उलटीचा वापर केला जातो. याचं कारण म्हणजे व्हेल माशाच्या उलटीमुळे सेंट परफ्यूम, अत्तर, अगरबत्ती आणि इतर सुगंधीद्रव्य वस्तू यांचा सुगंध बराच काळ टिकतो. तसेच व्हेल माशाची उलटी वापरून बनवलेले सुगंधी द्रव्य किंवा वस्तू यांची बाजारात हजारो-लाखो रुपयांत विक्री होते.

व्हेल माशाची उलटी बाळगणे कायदेशीर गुन्हा

एक किलो व्हेल माशाच्या उलटीपासून जवळपास दहा हजार लिटर महागडे अत्तर, परफ्युम, सेंट बनवले जाऊ शकते. त्यामुळे एक किलो व्हेल माशाच्या उलटीतून हजारो कोटी रुपयांची उलाढाल केली जाते. याकरता व्हेल माशाची उलटी ही महत्त्वाची मानली जाते. भारतात व्हेल माशाची उलटी ही वन्यजीव कायद्याअंतर्गत शेड्यूल वनमध्ये येत असल्याने व्हेल माशाच्या या संदर्भातील कोणताही भाग हा बाळगणे कायद्याने गुन्हा असून जामीनपात्र गुन्हा आहे. या अंतर्गत कमीत कमी तीन वर्षे आणि जास्तीत जास्त सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा या कायद्यांतर्गत नमूद करण्यात आलेली आहे.

संबंधित बातमी :

व्हेल माशाच्या उलटीचा म्हणजेच कोट्यवधींच्या ‘वोमिट गोल्ड’चा काळाबाजार करणारे दोन जण ताब्यात, पोलिसांची मोठी कारवाई