Param Bir Singh | परमबीर सिंग यांची गच्छंती अटळ, निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही?

| Updated on: Dec 02, 2021 | 9:16 AM

आयएएस अधिकारी देबाशीष चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या तपासानंतर काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार निलंबनाची कारवाई होण्याची चिन्हं आहेत.

Param Bir Singh | परमबीर सिंग यांची गच्छंती अटळ, निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही?
Param bir Singh, CM Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir Singh) यांचं लवकरच निलंबन होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांच्या निलंबन प्रस्तावाच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सही केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिंग यांच्या निलंबनाची प्रक्रिया राज्य सरकारने सुरु केली होती. आयएएस अधिकारी देबाशीष चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या तपासानंतर काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार निलंबनाची कारवाई होण्याची चिन्हं आहेत. हा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवला जाणार असल्याची माहिती आहे.

गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केले होते. अखेर गेल्या आठवड्यात त्यांनी कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये डीसीपी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी परमबीर सिंग यांची चौकशी केली.

काय आहे प्रकरण?

परमबीर सिंग यांच्याविरोधात एका पोलीस अधिकाऱ्यानेच तक्रार केली होती. खोट्या एफआयआरच्या माध्यमातून आपला छळ केल्याचा आरोप करत अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी एफआयआर दाखल केली होती.

काय होते आरोप?

‘परमबीर सिंग हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक 14 महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता.

सचिन वाझेच्या अटकेनंतर परमबीर सिंह अडचणीत

मनसुख हिरेन हत्या आणि अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याच्या आरोपात सचिन वाझेला अटक झाल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला 100 कोटींच्या खडणीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे पुढील चौकशीत हे प्रकरण कोणते वळण घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

‘फरार’ परमबीर सिंग अखेर मुंबईत, कांदिवलीत गुन्हे शाखेकडून चौकशी

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित