महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 100 कोटींच्या वसुलीच्या संदर्भात सीबीआयने पांडे यांची चौकशी केली. तर एनएसई कंपनी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने त्यांची चौकशी केली.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक
Follow us on
मुंबई : बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणी माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांना ईडीकडून अटक (Arrest) करण्यात आली आहे. अनेक प्रकरणांमध्ये त्यांना आरोपी करण्यात आले आहे. संजय पांडे यांची सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरु होती. या चौकशीनंतर पांडे यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 100 कोटींच्या वसुलीच्या संदर्भात सीबीआयने पांडे यांची चौकशी केली. तर एनएसई कंपनी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने त्यांची चौकशी केली. सोमवारी सीबीआयने प्रथम पांडे यांची चौकशी केली.
The Enforcement Directorate (ED) today arrested former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in connection with National Stock Exchange (NSE) co-location scam case: ED
संजय पांडे यांनी 2001 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आयटी ऑडिट फर्मची स्थापना केली, त्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. तेव्हा ते पोलिस सेवेत परतले आणि त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केले. 2010 ते 2015 दरम्यान, Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टमसाठी कंत्राट देण्यात आले होते. यापूर्वी सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला होता आणि आता ईडी तपास करत आहे.
नुकतेच 30 जून रोजी निवृत्त झाले पांडे
निवृत्त आयपीएस अधिकारी संजय पांडे हे मुंबई पोलिस आयुक्त पदावर येण्याआधी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळत होते. एप्रिल 2021 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने त्यांना महाराष्ट्राच्या DGP पदाची जबाबदारी दिली. मात्र, आयपीएस रजनीश सेठ यांची महाराष्ट्राच्या डीजीपीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला. 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हे मुंबई पोलिसांचे 76 वे पोलिस आयुक्त होते. आयपीएस हेमंत नगरले यांच्याकडून त्यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. पांडे नुकतेच 30 जून रोजी निवृत्त झाले. (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey arrested by ED)