मुंबई : सध्या तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi)ने सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांना पत्र धमकी (Threat)चे पत्र पाठवले होते. पत्र घराच्या जवळ टाकण्यासाठी त्याच्या टोळीतील तीन जण राजस्थानच्या जालोर येथून मुंबईत आले होते. त्यांनी आरोपी सौरभ महाकाळची भेट घेतली असल्याची माहिती मुंबई पोलीसांनी दिली. थेट सलमान खानला धमकी देण्यात आल्याने मुंबई पोलिसांना एक पद्धतीचं आवाहन होतं. परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. सलमानचे वडिल सलीम खान नेहमीप्रमाणे 5 जून रोजी मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांना हे धमकीचं पत्र मिळालं होतं.
Salman Khan threat letter case | Jailed gangster Lawrence Bishnoi had issued the letter to Salman Khan & his father Salim Khan. Three people from his gang had come from Jalore, Rajasthan to Mumbai to drop the letter & had met accused Saurabh Mahakal: Mumbai Police
हे सुद्धा वाचा(File pic) pic.twitter.com/hpZEk0cp1C
— ANI (@ANI) June 9, 2022
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकी देणाऱ्या पत्राचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पुण्यात जाऊन लॉरेन्स बिश्नोई टोळीचा भाग असलेल्या सौरभ महाकाळची चौकशी केल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सलमान खानच्या धमकी पत्र प्रकरणात महाकाळ आणि संतोष जाधव यांचा थेट संबंध नाही. ते या प्रकरणातील संशयित नाहीत, असे पोलीस सूत्रांकडून कळते. मात्र सलमान खानच्या धमकी पत्राबाबत महाकाळला माहिती असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तथापि, या प्रकरणात बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचे अधोरेखित केले जाऊ शकते. महाकाळकडे त्याबद्दलची माहिती असून त्याची चौकशी केली जाणार आहे. मात्र आतापर्यंतच्या तपासानुसार, महाकाळने याबद्दल काहीही उघड केलेले नाही.
पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मोक्का अंतर्गत अटक केली आहे. मुसेवाला हत्या प्रकरणात फरार आरोपी संतोष जाधवला फरार असताना आसरा दिल्याने पुणे पोलिसांनी त्याला पुणे-अहमदनगर सीमेवरुन ताब्यात घेतले. त्यानंतर मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पुण्यात जाऊन लॉरेन्स बिश्नोई टोळीचा भाग असलेल्या महाकाळची चौकशी केली. (Gangster Lawrence Bishnoi sent threatening letter to Salman Khan)