मुंबईत गॅस सिलेंडर चोरी करणारी टोळी गजाआड; टेम्पोसह 28 सिलेंडर पोलिसांकडून हस्तगत

| Updated on: Jul 11, 2021 | 5:26 PM

याप्रकरणी आतापर्यंत एकूण तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईत गॅस सिलेंडर चोरी करणारी टोळी गजाआड; टेम्पोसह 28 सिलेंडर पोलिसांकडून हस्तगत
मुंबईत गॅस सिलेंडर करणारी टोळी गजाआड
Follow us on

मुंबई : शहरातील विविध भागात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. या टोळीचे सदस्य रस्त्यावर उभा केलेला गॅस सिलेंडरचा टेम्पोच घेऊन पसार होत होते आणि नंतर त्यातला गॅस सिलेंडर ब्लॅक भावाने बाहेर विकत होते. या गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या टोळीच्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (Gas cylinder gang disappears in Mumbai; 28 cylinders with tempo seized by police)

टेम्पोसह गॅस सिलेंडर करत होते चोरी

या प्रकरणात वरळी कोळीवाड्यातील रहिवासी मांगीलाल भजनाराम सियाज यांनी 24 जून रोजी एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सियाज यांच्या ताब्यातील एक मालवाहू तीन चाकी एप्पे टेम्पो क्रमांक MH02 CE 7419 आणि त्यामध्ये भरलेले भारत गॅस कंपनीचे एकूण 20 गॅस सिलेंडर चोरी झाले. तसाच प्रकारचा एक गुन्हा ताडदेव पोलीस ठाण्यातही दाखल झाला होता, ज्यामध्ये अज्ञात आरोपींची एका तीनचाकी वाहनामध्ये भरलेले एचपी गॅस कंपनीचे 11 सिलेंडर चोरी केले.

गुन्ह्यांची कार्यपद्धती अनेक ठिकाणी सारखीच

एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले कि ह्या दोन्ही प्रकरणात गॅस सिलेंडर चोरी करण्याची पद्धत सारखीच आहे. जेव्हा तांत्रिक तपास केला गेला तेव्हा काही दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना चोरीला गेलेला मालवाहू तीन चाकी एप्पो टेम्पो क्रमांक MH02 CE 7419 अंधेरी पश्चिममध्ये रामकृष्ण मंदिर मार्गवर सापडला. त्याआधारे तपास करीत पोलिसांनी 5 जुलै रोजी मानखुर्दवरून आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता या गुन्ह्याची उकल झाली.

आरोपी ब्लॅकने विकत होते सिलेंडर

सुरुवातीला अटक आरोपीने चोरी केलेले सिलेंडर चेंबूर आणि घाटकोपर परिसरात राहणाऱ्या आपल्या ओळखीच्या लोकांना विकल्याचे कबुल केले. मात्र हे सिलेंडर लोकांना जास्त किंमत आकारुन ब्लॅकमध्ये विकले जात होते. बरेच लोक असे असतात ज्यांच्याकडे गॅस सिलेंडर घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसतात. अशा लोकांना हे चोरी केलेले सिलेंडर विकले जात होते.

याप्रकरणी तीन आरोपींना अटक

याप्रकरणी आतापर्यंत एकूण तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींचे नाव पापपुराम सुखराम विष्णोई उर्फ दारा उर्फ सुनील, दिलीप दादासो पांढरे, अनिल लालमल यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांची कसून चौकशी केली असता ताडदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गॅस सिलेंडर चोरीचा प्राकारही उघडकीस आला. आरोपींकडे एकूण 28 गॅस सिलेंडर आणि एक तीन चाकी वाहतूक टेम्पो जप्त करण्यात आला. सदर आरोपींनी मुंबईत बऱ्याच ठिकाणी असे गुन्हे केल्याची दाट शक्यता असून आणखी काही लोकांना लवकरच अटक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी पुढील तपास एन.एम. जोशी मार्ग पोलिस करत आहेत. (Gas cylinder gang disappears in Mumbai; 28 cylinders with tempo seized by police)

इतर बातम्या

वेटिंग लिस्टमध्ये ताटकळत बसू नका, कन्फर्म तिकीट कसे मिळवाल?

एसीसोबत पंखा चालवणे किती योग्य! ही आहे योग्य पद्धत