पत्नीला घाबरवत होता पण जीवानिशी गेला, तरुणासोबत नेमके काय घडले ?

| Updated on: Sep 23, 2022 | 10:45 PM

शेजाऱ्यांनी तात्काळ भगवानला जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

पत्नीला घाबरवत होता पण जीवानिशी गेला, तरुणासोबत नेमके काय घडले ?
वीजेचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : पती-पत्नीमध्ये क्षुल्ल्क कारणातून वाद (Dispute) झाला. या वादातून पत्नीला घाबरवण्यासाठी पती फास लावण्याचे नाटक करत होता, पण दुर्दैवाने ते खरं ठरलं आणि पतीचा मृत्यू (Death) झाला. विरार पश्चिमेतील वीर सावरकर मार्ग येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भगवान रामजी शर्मा असे 35 वर्षीय मयत पतीचे नाव आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी अपघाती मृत्यूची (Accidental Death) नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण ?

मयत भगवान आणि त्याची पत्नी चांदनीदेवी गेल्या 6 महिन्यांपासून विरार पश्चिमेतील लक्ष्मी निवास इमारतीत वास्तव्यास आहे. भगवान हा भाईंदरमधील एका कपड्याच्या फॅक्टरीत काम करतो.

भगवानने पत्नी चांदनीदेवी हिला कपडे खरेदी करण्यासाठी दोन हजार रुपये दिले होते. यातील 500 रुपये पत्नी त्याला परत करणार होती. मात्र नंतर पत्नीने पैसे परत केले नाही. यावरुन दोघा पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला.

हे सुद्धा वाचा

पत्नीला आत्महत्येची धमकी देत होता, पण…

यावेळी पतीने 500 रुपये परत केले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी पत्नीला दिली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आत्महत्येचे नाटक केले. मात्र दुर्देवाने हे नाटक त्याच्या जीवावर बेतले.

पत्नीने तात्काळ शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी तात्काळ भगवानला जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी पत्नीचा जबाब नोंदवत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.