कल्याण (ठाणे) : ट्रेनमध्ये लहान मुलीच्या हातात मोबाईल बघितला आणि प्रवाशाची नजर फिरली. चिमुकलीच्या हातातून मोबाईल हिसकावून प्रवासी तरुण घरी गेला. मात्र सीसीटीव्हीने या प्रवाशाचे बिंग फोडले. अखेर आदर्श कुमार नावाच्या तरुणाला अवघ्या पाच तासात कल्याण जीआरपीने अटक केले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे हा तरुण कामासाठी पहिल्यांदा मुंबईला आला होता. पण त्याने मुंबईत येतानाच चोरी केली. त्यामुळे आता त्याची रवानगी जेलमध्ये झाली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावर रविवारी (22 ऑगस्ट) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिहारहून पवन एक्सप्रेस आली. ट्रेनच्या एका बोगीत शबनम खातून ही महिला तिच्या दोन लहान मुलींसोबत प्रवास करीत होती. कल्याण रेल्वे स्थानकात गाडी थांबली होती. शबनम ही तिच्या सिटवर झोपेत होती. तिचा मोबाईल तिच्या लहान मुलीच्या हाती होती. शबनमही झोपेतून जागी झाली तेव्हा तिचा मोबाईल तिच्या मुलीच्या हाती नव्हता. गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचली होती. शबनमही पुन्हा चोरीस गेलेल्या मोबाईलची तक्रार देण्यासाठी कल्याणला आली.
कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु केला. शबनमचा चोरीस गेलेला मोबाईल सुरु होता. इतकेच नाही तर शबनमसोबत गाडी प्रवास करणारा एक प्रवाशाने हा मोबाईल हिसकावल्याचे पोलिसांना संशय होता. पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्हीच्या सहाय्याने प्रवाशाला शोधून काढले.
सीसीटीव्ही फूटेजमधील प्रवाशाचे हावभाव पाहून त्यानेच मोबाईल चोरला असेल. कारण तो प्रवासी सातत्याने मागे पाहत होता, असं कल्याण जीआरपीचे पोलीस निरिक्षक पंढरी कांदे यांनी सांगितलं. कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक पद्धतीने तपास सुरु केला. पोलिसांनी शबनमच्या मोबाईलवर फोन केला तेव्हा फोन सुरुच होता. अखेर पोलिसांनी आदर्श कुमारला तळोजाहून ताब्यात घेतले. त्याच्याकडून त्याने चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे.
आदर्श हा बिहारचा समस्तीपूरचा राहणारा आहे. तो कामानिमित्त प्रथमच मुंबईला आला होता. मोबाईल पाहून त्याची नियत फिरली. त्याची रवानगी आता जेलमध्ये करण्यात आली आहे.
हेही वाचा :
अंडरवर्ल्डच्या इक्बाल मिर्चीसोबत व्यवहार, प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात, नेमकं प्रकरण काय?