थर्टीफर्स्टची पार्टी, समलैंगिक संबंध ठेवण्याचा हट्ट, आणि…, पनवेलमधील मायलेकाच्या हत्येचं गूढ उकललं

| Updated on: Jan 02, 2025 | 9:46 PM

कामोठ्यातील ड्रीम्स हाउसिंग सोसायटीतील आई-मुलाच्या दुहेरी खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पोलिसांनी १९ वर्षीय संज्योत दोडके आणि शुभम नारायणी या दोघांना अटक केली आहे. आरोपींनी दारूच्या नशेत समलैंगिक संबंध ठेवण्याच्या आग्रहामुळे जितेंद्र जग्गी यांची हत्या केली आणि त्यांच्या आई गीता जग्गी यांचाही गळा आवळला. त्यानंतर त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू चोरी केल्या.

थर्टीफर्स्टची पार्टी, समलैंगिक संबंध ठेवण्याचा हट्ट, आणि..., पनवेलमधील मायलेकाच्या हत्येचं गूढ उकललं
पनवेलमधील मायलेकाच्या हत्येचं गूढ उकललं, 24 तासांत आरोपींना बेड्या
Follow us on

पनवेलच्या कामोठ्यातील ड्रीम्स हाऊसिंग सोसायटीमध्ये माय लेकरांच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. याप्रकरणी दोन 19 वर्षीय तरुणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. कामोठ्यात ड्रीम्ज अपार्टमेंटमध्ये एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मृत गीता यांचा मुलगा जितेंद्र याच्या डोक्यात आणि अंगावर मारल्याचे व्रण असल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनी जेव्हा दरवाजा उघडून जग्गी कुटुंबियांच्या घरात प्रवेश केला तेव्हा घरातील एलपीजी गॅस लिक असल्याचे आढळले होते. त्यानंतर या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.

सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यास सुरुवात करण्यात आली होती. कामोठे पोलीस आणि कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले यांनी चौकशी केली असता संज्योत मंगेश दोडके (वय १९), शुभम महेंद्र नारायणी (वय १९) या कामोठे येथील तरूणांची माहिती मिळाली. त्यांना पोलिसांनी उलवे परिसरातून ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

संज्योत मंगेश दोडके, शुभम महेंद्र नारायणी हे दोघेही मृत जितेंद्र जग्गी (वय ४५) याच्या परिचयाचे होते. मृत जितेंद्र याने दोघांनाही ३१ डिसेंबरला त्याच्या घरी पार्टी करण्यासाठी बोलावले होते. तिघांनी प्रचंड दारू प्यायली. दारू प्यायल्यानंतर मृत जितेंद्र हा संज्योत आणि शुभम यांना समलैगिंक सबंध ठेवण्यासाठी आग्रह करू लागला. याचा प्रचंड राग आल्याने शुभम नारायणी याने एक्सटेंशन बोर्ड जितेंद्र जग्गी याच्या डोक्यात मारून त्याला ठार मारले. तर संज्योत याने मृत गीता जग्गी यांचा गळा आवळला. त्यानंतर आरोपींनी घरातील किंमती सामान चोरून नेले. अखेर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली आहे.