मुंबई : किरीट सोमय्या यांच्यावर प्राणघातक हल्ला (Kirit Somaiya attack by Shiv Sena Worker) करण्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक (Stone attack) करण्यात आली. किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकात गेले होते. राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या हे खार पोलिस (Khar Police station) स्थानकात गेले होते. त्यावेळी तुफान राडा झाला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांच्या रोषाला किरीट सोमय्या यांना जावं लागलं. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत किरीट सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या यांनाही जखमा झाल्या. त्याच्या हनुवटीतून रक्त वाहत होतं. तर त्यांच्या शेजारी बसलेल्याला माणसाच्या हातातही तुटलेल्या खिडकीच्या काचा खुसल्या. या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांवर गंभीर आरोप केलेत. मला जीवे मारण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
आधी वाशिम, मग पुणे आणि आता खारमध्ये मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. तर दुसरीकडे शिवसैनिकांच्या अंगावर सोमय्यांनी गाडी घातल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. शनिवारी रात्री हा सगळा राडा झाला. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी किरीट सोमय्यांविरोधात खार पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे.
शनिवारी संध्याकाळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना अटक करण्यात आली.. पण त्यानंतर मात्र नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. पण खार पोलीस स्टेशनबाहेर पडताना शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली.. सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत चप्पलाही फेकण्यात आल्या. दगडफेकीत सोमय्या जखमी झाले. त्यानंतर जखमी सोमय्यांनी बांद्रे पोलीस स्टेशनबाहेरच ठिय्या दिला.
एकीकडे शुक्रवारी रात्री मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिका तुटून पडले. शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळ असलेल्या कलानगर सिग्नलवर हल्ला केला. या मोहित कंबोज यांच्या गाडीचा आरसा आणि दरावाजाचं हॅन्डल तुटलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसैनिक आणि किरीट सोमय्या यांच्यातही संघर्ष पाहायला मिळाला. किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या सोमय्या जखमी झाले.
शुकवारी सकाळी मातोश्रीबाहेर असलेले शिवसैनिक विरुद्ध राणा दाम्पत्य, शुक्रवारी रात्री शिवसैनिक विरुद्ध मोहित कंबोज, शनिवारी सकाळी पुन्हा शिवसैनिक विरुद्ध राणा दाम्पत्य आणि शनिवारी रात्री शिवसैनिक विरुद्ध किरीट सोमय्या असा संघर्ष पाहायला मिळाला. या सर्व घडामोडींमुळे राजकारण तापलंय.
भाजप नेत्यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले. सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन चौकशी केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांनी केली आहे.
रविवारी रात्री सोमय्यावर झालेल्या दगडफेकीवर अद्यापही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तक्रारीवर सोमय्यांनी सही न केल्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, असं सांगितलं जातंय. हल्ला झाल्यानंतर सोमय्या वांद्रे पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी स्वतःचा जबाब नोंदवला मात्र सही न करताच निघून गेले. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले सोमय्या तब्बल साडे तीन तासांनी बाहेर आले.. पण बाहेर आल्यावरच त्यांची पोलिसांवर हल्लाबोल केला. पोलिसांनी दाखल केलेल्या बोगस एफआयवर मी सही केली नाही अशी पहिली प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली.. माझ्यावर साठ ते सत्तर शिवैसनिकांनी हल्ला केला. पण पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या दबावात खोटा एफआयआर दाखल करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गृहसचिवांना भेटणार असल्याची माहिती सोमय्यांनी यावेळी दिली.